Breaking News

जयंत पाटील म्हणाले, भाजपाला जशी मते कमी पडतात तशी आम्हालाही… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिली माहिती

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर भाजपाकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अपक्षांची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. त्यामुळे आम्ही सहावा उमेदवार दिल्याचे स्पष्ट केले.

वाचा

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपाला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अपक्ष आमदारांच्या बेरजेमुळेच आमचा मतांचा कोटा पूर्ण होत असल्याने आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही. त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

वाचा

  • फडणवीसांच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले, श्रीमंत शाहु महाराजांचे वक्तव्य स्पष्ट
  • नरेंद्र मोदींची आठ वर्षे: देश आणि आर्थिक परिस्थिती
  • सद्यपरिस्थिती राज्यसभा निवडणूकीत विजयी होण्यासाठी ४२ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ १०६ आणि अपक्षांचा पाठिंबा दिलेल्या ७ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एकूण भाजपाकडे ११३ संख्याबळाचा आकडा आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे ५५ (आमदार लटके यांचे निधन झाल्याने एक जागा कमी), राष्ट्रवादी काँग्रेस ५३ आणि काँग्रेस ४२ असे मिळून १५० आमदारांचे संख्याबळ आहे. याशिवाय समाजवादी २, बच्चु कडूंच्या प्रहार संघटनेचे २, तसेच अपक्ष असे मिळून १६८ संख्याबंळ आहे. तर २ एमआयएमचे सदस्य विधानसभेत आहेत. हे दोन आमदार कोणाला मतदान करणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाचा

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *