Breaking News

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके संदर्भात मोठे विधान करत पीओकेचे भारतात विलिनीकरण होईल असा आशावाद एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केला. त्यावर जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेते फारूख अब्दुल्ला यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, पीओकेचे विलिनीकरण पाकिस्तान शांतपणे बघणार नाही, शेजारील देशाकडे ‘आपल्यावर पडणारे अणुबॉम्ब’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने फारूख अब्दुला यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी राजनाथ सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारताला पीओके ताब्यात घेण्याची गरज नाही कारण तेथील लोक स्वतःहून भारताचा भाग बनू इच्छितात.

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्याबाबत फारूख अब्दुला यांना विचारले असता, फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी श्रीनगरमध्ये म्हणाले की, “जर संरक्षण मंत्री पीओके संदर्भात जे बोलत आहेत तर त्यांनी त्यानुसार पुढे जाऊन कृती करावी कोणी त्यांना रोखलं आहे? असा सवाल करत ? पण लक्षात ठेवा, त्यांनी (पाकिस्तान) बांगड्याही घातल्या नाहीत. अणुबॉम्ब आहेत आणि दुर्दैवाने तो अणुबॉम्ब आपल्यावर पडेल, अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.

नॅशनल काँन्फरन्सचे नेते फारूख अब्दुला हे पाकिस्तानच्या भाषेत बोलत असल्याने त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये खळबळ उडाली.

भाजप नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, भारतीय गटाच्या नेत्यांवर “पाकिस्तानची छाप” अशी फारूख अब्दुला यांच्या वक्तव्यावर टीका केली.

आतापर्यंत, पाकिस्तानातील काही अतिरेकी नेत्यांनी त्यांच्याकडे अणुबॉम्ब असल्याचे म्हटले होते. पण आता, भारतीय गटाचे एक ज्येष्ठ आणि आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांनीही तेच म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, भाजप आणि (पंतप्रधान नरेंद्र) मोदींनी 26/11 ला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तानला नैतिक कव्हर फायर केले.

“पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे पुंछवरील वक्तव्य पाकिस्तानचे चुकीचे कृत्य लपविण्याचा प्रयत्न करते. ही पाकिस्तानची भाषा आहे. जसे पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंडिया ब्लॉकच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे आणि त्यांच्या नेत्यांवर पाकिस्तानची छाप आहे,” अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *