Breaking News

अर्थविषयक

मुख्यमंत्री शिंदेंची केंद्राकडे मागणी, ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करा

महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे झालेल्या कोळसा आणि खनिकर्म …

Read More »

विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार

बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री …

Read More »

हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय

”सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहित होण्यासाठी हरित ऊर्जा वापरावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. त्यामुळेच अमेरिकेसारख्या देशाने महाराष्ट्रात हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी ”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांच्या सदिच्छा भेटीवेळी केले. माईक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नातून दोन लाखा कोटींचे प्रकल्प येणार

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरीत्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज …

Read More »

दादाजी भुसे यांचे आवाहन, बंदरांच्या विकासासाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावे

राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. बंदरे विकास धोरण संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सभागृह येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. त्यावेळी भुसे बोलत होते. …

Read More »

रावसाहेब दानवेंचे आश्वासन, रेल्वेसाठी लागणाऱ्या उत्पादनांमध्ये खाजगी उद्योगांचा सहभाग वाढवु

रेल्वे विभागासाठी लागणार्‍या विविध उत्पादनांपैकी खाजगी उद्योगांसाठी अधिक उत्पादने खुली करू अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ललित गांधी यांना दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली मधील रेल भवन येथे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन रेल्वे विभागासाठी …

Read More »

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार करणार इलेक्ट्रिक वाहन, पर्यटन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी परस्परांना सहकार्य

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन राज्यातील संबंध अधिक दृढ  करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे …

Read More »

महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान

महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा ज्युरी (निवड समिती) पुरस्कार तामिळनाडू राज्याचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. जीएसटीचे विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम, पोपळघाट यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. मुंबई आणि पुणे झोनला यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य सुशील मोदी, पंजाबचे माजी …

Read More »

युवक व महिलांना उद्योजकता प्रोत्साहनासाठी महाराष्ट्र चेंबर व एम.एस.एम.ई मंत्रालय अभियान राबवणार

महाराष्ट्रातील युवकांना व महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरित करून त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व केंद्र सरकारच्या एम.एस.एम.ई मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात अभियान राबविण्यासाठी एम.एस.एम.ई खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित …

Read More »

तीन उद्योगाच्या बदल्यात एक उद्योग राज्याला मंजूर, पण अर्थसंकल्पात जाहिर होणार

राज्यातून दिड लाख कोटी गुंतवणूकीचा वेदांता-फॉक्सकॉन आणि २१ हजार कोटींचा टाटा-एअर बस उद्योग गुजरातला गेला. त्यापाठोपाठ सॅफ्रन हा उद्योगही राज्यातून हैद्राबादला गेला. हे तीन मोठे उद्योग राज्यातून गेल्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर अंतर्गत २ हजार कोटी रूपयांचा उद्योग मंजूर करण्यात आलेला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. …

Read More »