थोडेसे…
निसर्गाच्या नियमानुसार बदल हा होणे आवश्यक आहे. वेळ-काळानुसार तंत्रज्ञान, विज्ञान, आर्थिक, सामाजिक आणि राजकियस्तरावर मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. या बदलानुसार प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाच्या (पत्रकारीता) पध्दतीत आणि त्याच्या सादरीकरणातही बदल होताना आपल्याला पहायला मिळत आहे. मराठी ई बातम्या.कॉम या नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्हीही डिजीटल पत्रकारीतेत नव्याने पाऊल ठेवत आहोत.
पत्रकारीता करीत असताना अनेकवेळा एखाद्या विचारधारेकडे अति झुकण्याचे संकट असते. मात्र त्या संकटावर मात करत घडणाऱ्या घटनांकडे तटस्थपणे पहात वार्तांकन करण्याचा निश्चिय मराठी ई बातम्या.कॉमच्या टीमने केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि प्रकांड पंडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार भविष्यकाळात एखादा राजकिय पक्ष अथवा समाज, राज्य सरकारचा चूकीचा निर्णय याबाबत कठोर शब्दात लिहू. मात्र त्याबाबत व्यक्ती, समाज अथवा राजकिय पक्ष म्हणून आमच्या मनात कदापीही आकस असणार नाही.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून वाचकांना दैंनदिन घडामोडीबरोबरच शोध पत्रकारीतेच्या माध्यमातून काही धक्कादायक वास्तव ही वाचकांसाठी बातमीच्या स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
संपादक
आपलेही योगदान महत्वाचे-
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक स्तंभ म्हणून पत्रकारीतेकडे पाह्यले जाते. मात्र हा स्तंभ टिकून रहावा यासाठी त्याला सतत आर्थिक स्थैर्यता असणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्हा वाचकांचे योगदान आम्हाला महत्वाचे वाटते. त्यादृष्टीकोनातून या संकेतस्थळास जाहीरातीच्या स्वरूपात आर्थिक मदत करावीशी वाटली तर खालील ई-मेल वर संपर्क कराव.
ई-मेल संपर्क- editor@marathiebatmya.com