Breaking News

सामाजिक

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील या दिव्यांगाना राष्ट्रीय पुरस्कार

दिव्यांगव्यक्ती, राज्य शासन आणि गैरशासकीय संस्थांनी दिव्यांग कल्याण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठीचे वर्ष २०२१-२२ चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला सुगम्य भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गौरविण्यात आले. यासह राज्यातील चार दिव्यांग व्यक्ती, एक संस्था आणि अकोला जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात …

Read More »

पोलिस दलातील पदांसाठी तुम्ही शाररिक चाचणी परिक्षा दिलीय का? मग ही बातमी वाचाच

पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार यांचा मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आवाज असलेला सरसेनापती प्रताप गुर्जर यांच्यावर आधारीत हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी स्वत: राज ठाकरे यांनी प्रयत्न केले. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटावर सर्वचस्तरातून टीकेचा मारा सुरु झाला. त्यामुळे या चित्रपटाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यात …

Read More »

साहित्यिक आणि समिक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक- समिक्षक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. साठोत्तरीच्या कालखंडात कविता, कथा, दिर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समिक्षा अशा …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन तसेच बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्घाटन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे सायंकाळी 5 …

Read More »

वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

वीजबिल वसुलीसाठी गेलेले महावितरणच्या कर्मचाऱ्याना मारहाण करून शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवत अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने दंड व तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अमरावती येथील विश्वनाथ कॉलनीमध्ये राहणारे गणेश बळीराम तळोकार (५२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असुन ही घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये अमरावतीतील फरशी स्टॉपस्थित …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालू

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे …

Read More »

राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची राहुल गांधींच्या हस्ते सुरुवात

केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील ८ वर्षात लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे. लोकशाही व राज्यघटनेचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पुढाकाराने राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते आज …

Read More »

भीम आर्मीच्या संविधान जनजागृती यात्रेत एक वही एक पेनचा जागर

भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने संविधान दिन ते महापरीनिर्वाण दिन अशा १२ दिवसीय संविधान जनजागृती यात्रेचे आयोजन केले असून हार फुलांऐवजी वह्या पेन पुस्तक संगणक मोबाईल आदी शैक्षणिक साहित्य देवून या यात्रेचे स्वागत करावे असे आवाहन या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. भीम आर्मीने २६ नोव्हेंबर या संविधान दिनापासून ६ डिसेंबर …

Read More »

आता मोबाईलवर नंबर आणि नावही दिसणार

रोज आपल्याला मोबाइलवर अनेक कॉल्स येत असतात. त्यात बरेच नको ते यापैकी काही कॉल्स स्पॅम किंवा टेलिमार्केटिंग कंपन्यांचे असतात. अशा कॉल्समुळे आपण सर्व वैतागून जातो. यावर उपाय म्हणून आपण डीएनडी हे ऑप्शन वापरतो; पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. त्यावर व्यक्तीचा मोबाइल नंबर स्क्रीनवर दिसतो. त्यामुळे तो कॉल नेमका कुणी …

Read More »