Breaking News

सामाजिक

मित्र ना.धों महानोर यांचे निधनः शरद पवार यांची मन हेलावणारी प्रतिक्रिया अखेर वृक्ष उन्मळून पडला

शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र तथा ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आपल्या तरल काव्याच्या …

Read More »

उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना ६ महिन्यांत भूखंड वाटपाची कार्यवाही पूर्ण करणार मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

रायगड जिल्ह्यातील उरण येथील प्रकल्पासाठी सिडकोने २८ गावांमधील ४५८४ हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला. यापैकी १३४ हेक्टर जागा प्रकल्पग्रस्तांना देणे आवश्यक होते. १०४३ प्रकल्पग्रस्तांना १०२.९२ हेक्टर जागेचे वाटप करण्यात असून साडेबारा टक्के योजनेतंर्गत ५७५ प्रकल्पग्रस्तांना ३२.४२ हेक्टर जागेचे वाटप होणे बाकी आहे. अशा भूखंड वाटपाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा …

Read More »

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री …

Read More »

हम ने कर दिखाया असे जाहिरातून सांगणाऱ्या अदानी कंपनीची गुजरातवासियांकडून पोलखोल अहमदाबाद विमानतळ आणि परिसरात पाणीच पाणी

केंद्रात नरेंद्र मोदी प्रणित भाजपाचे सरकार आल्यापासून गौतम अदानी यांचा उद्योग सर्वात पुढे कसा काय या प्रश्नाचे उत्तर अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्चकडून या संस्थेकडून जारी करत अनेक गोष्टींवर संशय व्यक्त केला. त्याविषयीचे वादळ शांत होते न होते तोच अदानी विमानतळ कंपनीने इतरांनी बांधलेल्या विमानतळाची जबाबदारी घेतल्यानंतर सर्व दूरचित्रवाहिन्यांवर हम ने कर …

Read More »

‘बार्टी’मार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी या संकेतस्थळावर अर्ज करा १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी, पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) राबविण्यात येणार आहे. त्याकरिता १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. २७ ऑगस्ट २०२३ रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली …

Read More »

वीजबिलातील सवलतींचा लाभ घ्या महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे ग्राहकांना आवाहन

महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनच्या सुविधेमुळे वीजबिलात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजबिलातील सवलतीचा लाभ …

Read More »

देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी समिती गठित करा मंत्री मंगल प्रभात लोढा यांची सूचना

देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांना सुद्धा शिक्षणाचा समान अधिकार आहे. या महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी समिती गठित करण्यात येईल. या समितीने प्रस्ताव सादर करावा, असे महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने देहविक्री करणाऱ्या महिला …

Read More »

शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळाकरिता पुरेसा वेळ-आदिवासी विकास विभागाचा खुलासा

शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता स्वयंअध्ययन व खेळ यांकरिता पुरेसा वेळ मिळावा तसेच राज्यातील सर्व शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकसमान शाळेचे वेळापत्रक असावे, यासाठी शाळेच्या नियमित वेळेमध्ये बदल करुन शासकीय व अनुदानित आदिवासी निवासी आश्रमशाळेची वेळ सकाळी ८.४५ वाजता ते दुपारी ४.०० वाजता ठेवण्याबाबत व त्याची अंमलबजावणी १० …

Read More »

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दरवर्षी ७५ विद्यार्थी जाणार परदेशी शिक्षणासाठी

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सजायीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत नाही. …

Read More »

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी नवा निर्णय पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र ५० वर्षावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून ज्यांचे वय …

Read More »