राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाट्यामुळे महाराष्ट्रात एकच चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आपण महाविकास आघाडी सोबत की भाजपासोबत या विषयी शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले. तसेच बीडमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसची आज जाहिर सभा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेतील फुटीनंतर संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडताना सातत्याने शिंदे गटाकडून घडणाऱ्या राजकिय चुकांवर बोट ठेवले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबद्दल आणि शरद पवार यांच्या भूमिकेच्या अनुषंगाने मांडलेली भूमिका याला महत्व आले आहे.