Breaking News

माजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील मराठा समाजाचा विकासाच्यादृष्टीने सारथी संस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र राज्य सरकार अनुसूचित जाती-जमाती, एनटी, व्हीजेएनटी आदीबाबत निर्णय घेण्याचे टाळत सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायच करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मागील सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्याचा निर्णय घेत १०० कोटी रूपयांची तरतूद केली होती. मात्र त्यातील एक रूपयाही अद्याप खर्च करण्यात आलेला नाही. तसेच समता प्रतिष्ठानची स्थापना करत ६० कोटी रूपये देण्यात आले. मात्र आता ही संस्थाच मोठीत काढण्याचा घाट राज्य सरकारकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

सविस्तर व्हिडिओ पाह्यला विसरू नका…

Check Also

लॉकडाऊनमध्ये पगार कपात- नोकरी गेलेल्या कामगारांसाठी लढू.. व्हिडीओ पहायला विसरू नका कामगार कृती समितीचे विश्वास उटगी यांचे कामगारांना आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वच …

Leave a Reply

Your email address will not be published.