Breaking News

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांना म्हणाल्या, “याचं उद्घाटन आम्ही आधीच केलेय” ट्विटरवरून व्हिडीओच झाला व्हायरल

मराठी ई-बातम्या टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकिय शत्रुत्व जगजाहीर आहे. मात्र एका ऑनलाईन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आम्हीच या रूग्णालयाचे उद्घाटन या आधीच केल्याचे सांगण्याचे धाडस बॅनर्जी यांनी करत एक प्रकारे मोदींवर राजकिय कुरघोडी करण्याचा हा बहुधा पहिलीच घटना असावी.

कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर हॉस्पीटलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र आले होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी हे धाडस केल्याचे दिसून आले.

या ऑनलाईन कार्यक्रमास मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची देखील उपस्थिती होत्या. या प्रसंगी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींसमोर म्हणाल्या की, “आरोग्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दोनदा फोन केला होता. मला वाटले हा कोलकात्यातील कार्यक्रम आहे, पीएम मोदी स्वत: यामध्ये रस दाखवत आहेत. याबद्दलची माहिती मी हे सांगू इच्छिते की, याचं उद्घाटन आम्ही अगोदरच केलं आहे. कसं केलं? कोरोना काळात आम्हाला केंद्रांची गरज होती. तेव्हा मी स्वत: एक दिवस तिकडे गेली असताना, चित्तरंजन रुग्णालय मी पाहिले की, हे राज्य सरकारशी जोडलेले आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्याचे उद्घाटन करून त्याचे कोरोना सेंटर बनवले.

राज्य सरकार कर्करोग रुग्णालयासाठी २५ टक्के बजेट देत आहे. या रुग्णालयासाठी राज्य सरकारने ११ एकर जागा दिली आहे. त्यामुळे लोकांचा विचार करता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे काम केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

राहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले?

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *