Breaking News

आमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतल्या मागण्या

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात येण्यास राज्य सरकारने जनतेला मनाई केली. त्यामुळे एका शिक्षकाने आपल्या प्रश्नासाठी मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास प्रवेश न मिळाल्याने अखेर त्याने आकाशवाणी आमदार निवासाच्या ४ थ्या मजल्यावर सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेत त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. अखेर त्या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलिसांनी दिली.

यासंदर्भातील माहिती मरिन ड्राईव्ह पोलिस आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क करून घेण्याचा प्रयत्न केला असता भरणे यांचा फोन लागला नाही. तर मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

Check Also

लॉकडाऊनमध्ये पगार कपात- नोकरी गेलेल्या कामगारांसाठी लढू.. व्हिडीओ पहायला विसरू नका कामगार कृती समितीचे विश्वास उटगी यांचे कामगारांना आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वच …

Leave a Reply

Your email address will not be published.