Breaking News

Recent Posts

शरद पवार यांचा आरोप, हे जाणून बुजून घडविल्या जातय

राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर …

Read More »

मंत्री अनुराग ठाकूर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कुस्तीगीरांनी ठेवल्या या पाच मागण्या

मागच्या ३५ दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत असलेल्या कुस्तीगीरांनी आता आपल्या पाच मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. अखिल भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येतं आहे. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीगीरांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन कुस्तीगीरांनी …

Read More »

राज्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबविणार

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. नव्याने निर्माण करण्यात आलेला दिव्यांग कल्याण विभाग तीन महिन्यात दिव्यांगांच्या दारी पोहचला असून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती या …

Read More »

जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात

महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे, असे प्रतिपादन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या १८ व्या वर्धापन …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहनः या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करा अन् ८ तासात रिझर्ल्ट बघा

नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (8169681697) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते …

Read More »

अजित पवार यांचा निशाणा, ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना

मुंबईतील शासकिय वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरले. तसेच असल्या घटना राज्यात …

Read More »

हेलिकॉप्टर दौऱ्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले, शरद पवारांची स्वप्ने कधी पूर्ण झाली नाहीत

निवडणूका आल्या की शरद पवार हे नेहमीच तीच तीच वक्तव्ये करतात, २०१४, २०१९ आणि आताची वक्तव्ये काढून बघा त्यांची तीच वक्तव्ये असतात. देशात मोदींच्या नावांवर ३०० खासदार निवडूण जात आहेत आणि पवार म्हणतात की देशात मोदी विरोधात लाट आहे. त्यामुळे आता आम्हालाही माहित झालेय की, शरद पवार यांचीच तीच वक्तव्य …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळते?

महाराष्ट्रात कट कारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप,…सुरक्षिततेबद्दल केंद्र सरकार ना महाराष्ट्र सरकार गंभीर

मुंबईतील शासकिय सावित्रीबाई फुले वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग …

Read More »

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरील मरीन ड्राईव्ह येथील शासकिय वसतिगृहात तरूणीची हत्या

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई शासकिय वसतिगृहातील अठरा वर्षीय तरुणीची हत्या करून एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला …

Read More »

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये राज्यातील या ६७ शैक्षणिक संस्था

भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन २०२३ चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी जाहीर केला. शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण १३ श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट ८५० संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय …

Read More »

लहान मुलांसाठी पहिली किलबिलाट रूग्णवाहिनी

अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ तयार करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री लोढा, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल …

Read More »

इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय? मग जाणून घ्या

जुलै- ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेसाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास १६ जून २०२३ पर्यंत मुदत आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल या महिन्यात जाहीर झाला. महाराष्ट्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प देशातील एकमेव महाराष्ट्रात

“कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

अजित पवार यांचा आरोप, निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक…

सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे, त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि …

Read More »