Breaking News

धमकीप्रकरणी आमदार शेलार यांनी गृहमंत्र्यांना लिहिले पत्र भाजपा नेते आ. अॅड आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

मराठी ई-बातम्या टीम

दोन दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांना त्यांच्या कुटुबियांसह जीवे मारण्याची धमकी दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून देण्यात आल्याने यासंदर्भात शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शेलार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही एका पत्राद्वारे यासंदर्भातील तक्रार आज केली.

राज्यातील भाजपा नेते तथा वांद्रेचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी सातत्याने मुंबई महापालिकेतील घोटाळा उघडकीस आणत आहेत. त्याचबरोबर भाजपाचे विधिमंडळातील मुख्य प्रतोदही आहेत. त्यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली असून शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी एक अज्ञात इसम देत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ ही करण्यात आल्याचे समजते आहे.

या प्रकरणी आमदार अॅड शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली असून सदर दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली.

यापुर्वी एकदा सन २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्यापुर्वी अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती सापडली होती.

आता पुन्हा अतिरेक्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार अॅड आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर आहे. याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती दिली.

 

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *