Breaking News

चंद्रकांत पाटील यांचा नाना पटोलेंना इशारा, “मर्यादेत रहा” मुंबईदेवीला प्रार्थना केल्यांतर दिला इशारा

मराठी ई-बातम्या टीम

नाना पटोले यांना आम्ही गांर्भीयाने घेत नाही. ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांना मर्यादा समजत नाही. जर आम्ही मर्यादा सोडली तर आम्हाला काय बोलायचे आहे ते आम्ही बोलू. पण त्यांनी मर्यादेत रहावे असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

काल पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी पुढे आल्यानंतर आज त्यांच्या दिर्घायुष्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुंबादेवीचे दर्शन घेत प्रार्थना केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

पटोले काहीही बोलत असतात. त्यामुळे आम्ही त्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही. आम्हाला आमच्या मर्यादेचे भान आहे. पण त्यांना रहात नसल्याचे सांगत नाना पटोलेंनी आपल्या मर्यादेतच रहावे असा इशारा दिला.

त्याचबरोबर जवळपास मी छगन भुजबळ हे ज्या भागाचे नगरसेवक होते. त्या भागात माझे आजही घर आहे. त्या घरात मी जवळपास १२-१३ वर्षे राहील्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

Check Also

लॉकडाऊनमध्ये पगार कपात- नोकरी गेलेल्या कामगारांसाठी लढू.. व्हिडीओ पहायला विसरू नका कामगार कृती समितीचे विश्वास उटगी यांचे कामगारांना आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *