Breaking News

Editor

राज्यपाल रमेश बैस यांची तंबी, निकाल जाहिर करण्यास उशीर, कुलगुरूंना जबाबदार धरणार… राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या तयारीचा राज्यपालांकडून आढावा

विद्यापीठांच्या (University) विविध परीक्षांचे निकाल (Exam Result) तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहिर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत. विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे (Student) भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहिर करण्यास विलंब झाल्यास …

Read More »

अकोला, शेवगाव दंगलप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले पोलिस महासंचालकांना ‘हे’ आदेश सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलीनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, दिवाळीनंतर राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणूका.. अखेर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार

मागील काही वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षित जागांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनेक महापालिकांच्या मुदतीचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप निवडणूका झालेल्या नाहीत. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी चार तात्पुरती बस स्थानके उभारणार पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर …

Read More »

अशोक टेकवडे यांच्या पक्षांतरावर अजित पवार म्हणाले, ती कारणं त्यांनाच विचारा… मला मिळालेली माहिती वेगळीच आहे

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा पहायला मिळत आहे. यासंदर्भात महाविका आघाडीतील तिन्ही पक्षांकडून चर्चा सुरू करण्यात आली असली, तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपामध्ये करण्याचा निर्णय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय, बेदरकारपणे वाहन चालविणारे अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत… कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा-वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये

विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये …

Read More »

लंडनहून परतताच राहुल नार्वेकर म्हणाले, बाहेर केलेल्या भाष्यावर मी टिप्पणी… सर्वप्रथम पार्टी कुणाची हे ठरवावे लागले त्यानंतरच पुढील निर्णय

शिवसेना फुटीवर आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून १५ दिवस, २० दिवसात तर काहींनी २ महिन्यात निर्णय घेण्याची मागणी केली. यावर सध्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, आगामी निवडणूकांमध्ये मविआसोबत मित्रपक्षांनाही स्थान… सहा जणांची समिती ठरविणार लोकसभा आणि विधानसभा वाटप

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या व कुणी लढवाव्यात यावर सविस्तर चर्चा काल महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली. मात्र याबाबतची सविस्तर चर्चा मविआच्या सहा जणांच्या बैठकीत ठरविण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी …

Read More »

प्रदेशाध्यक्ष डि के शिवकुमार यांच्या वाढदिनानिमित्त काँग्रेसने दिली गटनेते (मुख्यमंत्री) पदाची भेट १३५ आमदारांचा एकमुखी पाठिंबा

कर्नाटकातील काँग्रेसच्या एकहाती यश मिळविण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि.के.शिवकुमार यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सिध्दरामय्या यांचाही वाटा आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा निकालाच्या दिवसापासून सुरु होती. अखेर आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित १३५ आमदारांच्या बैठकीत सर्व आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी डि.के.शिवकुमार यांच्या नावाला सहमती …

Read More »

देशभक्त असल्याची… प्रतिक्रिया समीर वानखेडेंची तर पत्नी क्रांती रेडकर म्हणाल्या सहकार्य…. सीबीआयने १२ तासांपेक्षा अधिक काळ झडती घेतली

केंद्र सरकारच्या एनसीबी विभागाचे झोनल ऑफिसर म्हणून समीर वानखेडे यांनी काम पहात असताना बॉलीवूड बादशाह शाहरूख यांना याचा चिरंजीव आर्यन खान याला खोट्या केस मध्ये अडकवून २५ कोटी रूपये उकळण्याचा डाव आखल्याप्रकरणी सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करत वानखेडेंशी संबधित जवळपास ३९ ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर सीबीआय समीर …

Read More »