Breaking News

Editor

EVM आणि VVPAT प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १८ एप्रिलला

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१६ एप्रिल) व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) रेकॉर्डच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) ची संपूर्ण पडताळणी करण्याच्या याचिकांवर सुनावणी केली. दोन तासांहून अधिक काळ सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी १८ एप्रिल रोजी ठेवली. उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा …

Read More »

इराणच्या राजदूताचे आश्वासन, जहाजावरील भारतीय क्रु मेंबर्संना लवकरच सोडू

इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात घेतलेल्या इस्रायलशी संबंधित कंटेनर जहाजात बसलेले सर्व १७ भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. जहाजाच्या क्रूला ताब्यात घेतले गेले नाही आणि ते जेव्हा हवे तेव्हा जहाज सोडू शकतात. इराणच्या राजदूताच्या म्हणण्यानुसार पर्शियन आखातातील हवामानाची स्थिती चांगली नाही …

Read More »

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनी राज्यात १ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान एकूण ४२१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, फ्रिबीज, मौल्यवान धातूंचा इतर बाबींचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य …

Read More »

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या वर्षी आदित्य श्रीवास्तव याने प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर अनिमेश प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी याने क्रमांक पटकावला. उमेदवार त्यांचे संबंधित निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी UPSC च्या अधिकृत upsc.gov.in. या वेबसाइटला भेट देऊन अधिकची माहिती …

Read More »

चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १०,६५२ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत ९५,५४,६६७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) २१,५२७ तर …

Read More »

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळी कॉंग्रेस नको म्हणून त्यावेळी देशाची फाळणी मागणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर पश्चिम बंगालमध्ये युती केली होती. म्हणून कदाचित नरेंद्र मोदींच्या आठवणी ताज्या झाल्या असतील, असा टोला लगावत नरेंद्र मोदी यांना मुस्लिम लीगची अधिक माहिती असेल …

Read More »

‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच!

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगल्या वळणावर आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी ही आई उत्तम करत असते, म्हणूनच जागतिक ‘मदर्स डे’चं निमित्त साधून ‘बुनी बियर्स’ या लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपटाच्या मालिकेचा पुढचा भाग ‘बुनी बियर्स गारडियन्स कोड’ हा १० …

Read More »

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी असून भाजपाचा दारुण पराभव होणार यात तिळमात्र शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही त्याची जाणीव आहे. अमरावती लोकसभा मतदारंसघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच ‘मोदींची हवा नाही, हवेत उडू …

Read More »

ताटकळलेल्या उदयनराजे भोसले यांना अखेर भाजपाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूक २०२४ सालच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांच्या यांना भाजपाने उमेदवारी जाहिर केली. विशेष म्हणजे सातारा लोकसभा निवडणूकीसाठी यापूर्वी कधीही उदयनराजे भोसले यांना किंवा त्या घराण्याशी संबधित व्यक्तीला आतापर्यंत निवडणूकीतील उमेदवारीसाठी ताटकळत ठेवले नव्हते. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी उदयनराजे भोसले यांना भाजपाने बराचकाळ ताटकळत ठेवण्यात आल्याची चर्चा …

Read More »