Breaking News

आरोग्य

कोविड-१९ काळात भारतात मोठ्या प्रमाणावर मृत्यूः केंद्र सरकारने दावा फेटाळला सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये प्रकाशित अभ्यास अहवालात दावा

भारतात २०२० मध्ये कोविड- १९ संसर्ग जन्य आजाराच्या काळात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सायन्स ॲडव्हान्सेसने प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालात काढण्यात आला. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा अभ्यास असमर्थनीय आणि अस्वीकार्य अंदाजांवर आधारित असल्याचे सांगत सायन्स अॅडव्हान्सेसने केलेला दावा फेटाळू लावला. २०२० मध्ये सायन्स ॲडव्हान्सेस आपल्या संशोधन अहवालात मागील …

Read More »

एडीस डासांद्वारे होणारा झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे नियम पाळा आरोग्य विभागाची प्रशासनाची यंत्रणा सज्ज

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण …

Read More »

क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती

देशाला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. देशाच्या क्षयरोग मुक्तीच्या लढ्यात महाराष्ट्र राज्यही मागे नाही. राज्यातही क्षयरोग निर्मुलनाबाबत प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने ११ राज्यांमध्ये १८ वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये राज्याचाही समावेश आहे. लस घेण्यासाठी …

Read More »

हसन मुश्रीफ यांची माहिती, पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली माहिती

पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या …

Read More »

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन बंद करण्यासाठी डब्लूएचओने अधिकृत जारी केली थेरपी थेरपीचे नाव निकोटीन रिप्लेसमेंट जारी केली

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने प्रौढांमध्ये तंबाखू बंद करण्यासाठी आपली पहिली नैदानिक ​​उपचार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT) आणि bupropion आणि cytisine सारख्या प्रिस्क्रिप्शन औषधांची शिफारस करत आहे. जगभरातील ७५० दशलक्षाहून अधिक तंबाखू वापरकर्त्यांना समर्थन देणे हे मार्गदर्शक तत्त्वाचे उद्दिष्ट आहे जे सर्व प्रकारचे तंबाखू सोडू …

Read More »

राज्यात झिका विषाणू संसर्ग वाढतोय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली जाहीर या वर्गासाठी जारी केल्या नियमावली

महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली निर्गमित केली आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी झिका विषाणूच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे. गर्भवतींसाठी विशेष सूचना राज्यांना गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी …

Read More »

टीबी आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवे धोरण केंद्रीय मंत्रालयाकडून नव्याने अभियान सुरू करण्याचा विचार

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने २०२५ पर्यंत देशातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने काम करत असताना क्षयरोग (टीबी) विकृती आणि मृत्यूच्या ओझ्यामध्ये झपाट्याने घट करण्याचे भारताचे लक्ष्य साध्य झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) प्रोटोकॉलचे पुन: नव्याने निर्माण करण्याचाविचार करत असून विशेषत: TB …

Read More »

आरोग्य विम्याबाबत आयआरडीएआयने समाविष्ट केलेला हा नियम माहित आहे का? ग्रेस पिरियड देणे कंपन्यांवर बंधनकारक

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआय IRDAI ने पॉलिसीधारकांसाठी आरोग्य विमा सुलभ करण्यासाठी आणि वर्धित करण्यासाठी एक नवीन मास्टर परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकात नमूद केलेल्या मुद्द्यांपैकी एक असे नमूद केले आहे की आरोग्य आणि सामान्य विमा कंपन्यांनी मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक, आरोग्य विम्याचे प्रीमियम हप्त्यांमध्ये भरल्यास …

Read More »

आरोग्य विमा संदर्भातील नवे नियमाचे परिपत्रक जाहिर आयआरडीएआयने केली निकषांमध्ये सुधारणा

पॉलिसीधारकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणि सर्वसमावेशक आरोग्य विम्याला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने नियामक निकषांमध्ये मोठी सुधारणा जाहीर केली आहे. नियामकाने आरोग्य विमा उत्पादनांवरील सर्वसमावेशक मास्टर परिपत्रक जारी केले असून ५५ परिपत्रके रद्द केली आहेत. हे मास्टर परिपत्रक आयआरडीएआय IRDAI ने गेल्या …

Read More »

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित ससूर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

पुणे कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीच्या ब्लड सॅम्पल बदलणारे ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी हाळनोर यांच्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी निलंबनाची कारवाई केली. तर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून ससून रुग्णालयाचा शिपाई …

Read More »