Breaking News

आरोग्य

मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ: होमक्वारंटाईन ५.८५ लाखावर मुंबईसह उपनगरात ३०३१२, तर महाराष्ट्रात ६ हजार रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधितांच्या काल आढळून आलेल्या संख्येच्या तुलनेत आज मुंबईत, उपनगर आणि राज्यात तिन्ही ठिकाणी ५-५ हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज १९ हजार ७८० तर मुंबई उपनगरातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड आणि पनवेलमध्ये मिळून १० हजार रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात …

Read More »

वाढत्या रूग्णसंख्येसंदर्भात आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी दिली ही माहिती तिसऱ्या लाटेमुळे रूग्णसंख्या जास्त असण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम डिसेंबर महिना अखेरपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यासंदर्भात आज केंद्र सरकराकडून यासंदर्भातील माहिती प्रसारीत करण्यात आली असून देशातील आर व्हॅल्यू जे संक्रमणाचा प्रसार दर्शविते ते करोनाची दुसरी लाट पीकवर असताना १.६९ होते, ते आता २.६७ वर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत …

Read More »

मुंबईसह उपनगरात कोरोनाचा विस्फोट: तब्बल २१ हजार रूग्ण तर महाराष्ट्रात ५ हजार ओमायक्रॉनचे मुंबईत १०० तर राज्यात ४४ जण आढळले

मराठी ई-बातम्या टीम दिवस जसजसे जात आहेत तसतसे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत वाढ होत असून काल १५ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज त्यात ६ हजारांची वाढ झाली असून मुंबईत १५ हजार तर उपनगरात ६ हजार रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ५ हजार रूग्ण आढळले असून एकूण राज्यात २६ …

Read More »

मुंबईसह महानगर प्रदेशात १५ हजार तर ओमायक्रॉन ७५ मुंबईत स्फोट ! तर राज्यात १८ हजार ४४६ रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महानगर प्रदेशात आणि राज्यात ११ हजार रूग्ण संख्या सोमवारी आढळून आल्याने अनेक कोरोनाबाधित नियंत्रणात आल्याची अटकळ बांधण्यात येत होती. परंतु ही अटकळ मंगळवारी फोल ठरली असून मुंबई १० हजार ६०६ इतके बाधित आढळून आले असून मुंबईसह उपनगरात एकूण १५ हजार ६६३ इतके बाधित आढळून आले आहेत. …

Read More »

पहिल्या दिवशी सर्वाधिक तरूण लसवंत ठाण्यात तर राज्यात १ लाख ८३ हजार लस ४ लाख ५० लाखाचे लक्ष्य होते

मराठी ई-बातम्या टीम ३ जानेवारीपासून देशभरातील सर्व १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार कालपासून लसीकरणास सुरुवात झाली. काल दिवसभरात १ लाख ८३ हजार २५९ तरूणांचे लसीकरण झाल्याची माहिती आज आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. विशेष म्हणजे राज्यात तरूणांसाठी जारी …

Read More »

मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८

मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख कायम असून आज दिवसभरात राज्यात १२,१६० इतके कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे ६८ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक कोरोनाबाधित एकट्या मुंबई शहरात आढळून आले असून ही संख्या ७ हजार ९२८ इतके आढळून आले …

Read More »

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणतात, जर ही गोष्ट केली तर कोरोनामुक्त होवू जगातील असमानता नष्ट केल्याशिवाय सर्वांना लस मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दोन वर्षे झाली जगात कोरोनाने केलेला प्रवेश काही केल्या परत जात नाही. त्यामुळे कोरोनाला पराभूत करण्यासाठी जवळपास सर्वच देशांनी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरु केलेले असले तरी त्यात म्हणावे तसे यश येताना दिसून येत नाही. त्यामुळे जगभरात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर डब्लूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे …

Read More »

चिंता वाढली: तब्बल ११ हजाराहून अधिक कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनचे ५० सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत तर ओमायक्रॉनचे पुण्यात

मराठी ई-बातम्या टीम राज्यात नवं वर्षाचे आगमन झाल्यानंतर आणि सलग दोन दिवस साप्ताहिक सुट्या असल्याने नागरीक घरीच थांबतील आणि कोरोनाचा प्रसार रोखला जाईल असा अंदाज बाधंला जात असतानाच काल शनिवारी १४ टक्क्याने रूग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर आज त्यात आणखी वाढ झाली. ही वाढ थोडी-थोडकी नसून आज तब्बल ११ हजार ८७७ …

Read More »

राज्यात आज ९ हजार रूग्ण, मुंबईसह एमएमआरमध्ये ८ हजार ओमायक्रॉन ६ तर ७ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम नवं वर्ष स्वागताच्यादृष्टीकोनातून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असले तरी मुंबईसह महानगर प्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत असून आज राज्यात ९ हजार १७० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत ६ हजार १८० आणि उपनगरांमध्ये जवळपास २ हजार रूग्ण असे मिळून मुंबईसह उपनगरांमध्ये ८ …

Read More »

राज्यात कालच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत एकदम ३ हजाराने वाढ मुंबईत सर्वाधिक बाधितांची संख्या आढळून एक हजाराने वाढ

मराठी ई-बातम्या टीम नववर्षाचा अवधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असून कालच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजाराने वाढ झाली आहे. तर मुंबईतील रूग्ण संख्येत जवळपास एक हजाराने वाढ होत ५५४३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात मुंबईसह राज्यात एकूण ८,०६७ इतके रूग्ण आढळून …

Read More »