Breaking News

मुंबई, ठाणे आणि पुण्यात जवळपास एकसारखे कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनमध्ये वाढ ३३ हजार ३५६ बरे होवून घरी गेले तर १९ लाख होम क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराची घट आलेली आहे. तसेच मुंबईतील संख्येतही चांगलीच घट आली असून आज मुंबईत ११ हजार ३१७ इतके, तर ठाणे शहर व जिल्ह्यासह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी ठिकाणी मिळून जवळपास १० हजार असे मिळून मुंबई ठाण्यात २२ हजार ०३७ रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे-पिंपरी चिंचवड जिल्ह्यांमध्ये १० हजार रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईसह महाराष्ट्रात ४३ हजार २११ इतके आज रूग्ण आढळून आले आहे.

आढळून येणाऱ्या रूग्णांच्या तुलनेत आज ३३,३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८% एवढे झाले आहे. राज्यात आज १९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१५,६४,०७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७१,२४,२७८ (९.९६  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,१०,३६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असून होम क्वारंटाईमध्ये असणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात २३८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान  शिक्षण आणि संशोधन  संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. सर्वाधिक रुग्ण पुणे मनपामध्ये आढळून आले असून १९७ रूग्ण इतकी संख्या आहे. तर त्यानंतर पिंपरी चिंचवड – ३२, पुणे ग्रामीण आणि नवी  मुंबई–  प्रत्येकी ३, मुंबई- २, अकोला-१ असे रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११३१७ ९७९२५६ १६४३५
ठाणे ८५३ ११०९८७ २२३९
ठाणे मनपा २०५८ १७३९६० २१२४
नवी मुंबई मनपा १७४६ १४७५०७ २०१६
कल्याण डोंबवली मनपा ११३३ १६८११९ २८७८
उल्हासनगर मनपा १७८ २४६१७ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ६८ १२४०९ ४८९
मीरा भाईंदर मनपा ८०९ ७२०८१ १२०८
पालघर ५६४ ६००९७ १२३५
१० वसईविरार मनपा ९८० ९३८८६ २१०७
११ रायगड ९१६ १२६३९० ३३९३
१२ पनवेल मनपा १४१५ ९३३७५ १४४२
ठाणे मंडळ एकूण २२०३७ २०६२६८४ १५ ३६२२९
१३ नाशिक ३९७ १६७५५८ ३७६३
१४ नाशिक मनपा १५१६ २४८०४० ४६६५
१५ मालेगाव मनपा २६ १०३१७ ३३६
१६ अहमदनगर ९३ २७६५५३ ५५३२
१७ अहमदनगर मनपा ६७५ ७०६२९ १६३६
१८ धुळे ४० २६४५४ ३६३
१९ धुळे मनपा ५५ २०२७४ २९४
२० जळगाव १४९ १०७८५१ २०५९
२१ जळगाव मनपा १३९ ३३३५१ ६५७
२२ नंदूरबार ९२ ४०४४४ ९४८
नाशिक मंडळ एकूण ३१८२ १००१४७१ २०२५३
२३ पुणे २०२० ३८०६९६ ७०५३
२४ पुणे मनपा ५५६१ ५६५३५१ ९३०३
२५ पिंपरी चिंचवड मनपा २४६६ २८६५९९ ३५२९
२६ सोलापूर २५५ १७९७७८ ४१४२
२७ सोलापूर मनपा १७९ ३३६४२ १४७५
२८ सातारा ९४० २५६३९१ ६५०३
पुणे मंडळ एकूण ११४२१ १७०२४५७ ३२००५
२९ कोल्हापूर १६९ १५६२८२ ४५४७
३० कोल्हापूर मनपा २०१ ५३००१ १३०६
३१ सांगली २३८ १६५४९८ ४२८२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३७ ४७१७७ १३५३
३३ सिंधुदुर्ग १९७ ५४१०५ १४५०
३४ रत्नागिरी २२२ ८०७६८ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण १२६४ ५५६८३१ १५४३६
३५ औरंगाबाद १७४ ६३२७१ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ४८३ ९५९२० २३२९
३७ जालना १२९ ६१३६४ १२१७
३८ हिंगोली २३ १८६४५ ५०८
३९ परभणी ४७ ३४४७२ ७९३
४० परभणी मनपा ५७ १८५५८ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ९१३ २९२२३० ७२२६
४१ लातूर २६७ ६९७६१ १८०३
४२ लातूर मनपा २०५ २४७७९ ६४५
४३ उस्मानाबाद १५१ ६८९३५ १९९२
४४ बीड ७२ १०४५५१ २८४३
४५ नांदेड २१५ ४७३२३ १६२६
४६ नांदेड मनपा ३१७ ४५३०२ १०३४
लातूर मंडळ एकूण १२२७ ३६०६५१ ९९४३
४७ अकोला ५७ २५८८७ ६५५
४८ अकोला मनपा १९६ ३४३३० ७७३
४९ अमरावती ३८ ५२६९७ ९८९
५० अमरावती मनपा ८२ ४४३४३ ६०९
५१ यवतमाळ १०७ ७६६४२ १८००
५२ बुलढाणा ९४ ८६०३३ ८१२
५३ वाशिम ४१ ४१९४९ ६३७
अकोला मंडळ एकूण ६१५ ३६१८८१ ६२७५
५४ नागपूर ३०० १३१२०९ ३०७५
५५ नागपूर मनपा १३९८ ३७३३७८ ६०५५
५६ वर्धा २०५ ५८१८८ १२१८
५७ भंडारा ११४ ६०५३६ ११२४
५८ गोंदिया १४९ ४१३२७ ५७१
५९ चंद्रपूर १९५ ६००६२ १०८८
६० चंद्रपूर मनपा ६८ ३०१८७ ४७८
६१ गडचिरोली १२३ ३१०४२ ६६९
नागपूर एकूण २५५२ ७८५९२९ १४२७८
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ४३२११ ७१२४२७८ १९ १४१७५६

Check Also

कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत …

Leave a Reply

Your email address will not be published.