Breaking News

कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत घट, मात्र होम क्वारंटाईन २२ लाखावर तर ३९ हजार बरे ४२ हजार ४६२ हजार रूग्णांची नोंद तर १२५ ओमायक्रॉनबाधित

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात दैंनदिन आढळून येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज २ हजाराची घट आलेली आहे. तर राज्यात तब्बल २२ लाखाहून अधिक रूग्ण होम क्वारंटाईमध्ये असल्याने कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असून गृह विलगीकरणात राहणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. काल हीच संख्या १९ लाखावर होती त्यात आता जवळपास ३ लाखाने वाढ झाली असून आज ही संख्या २२ लाखाहून अधिक झाली आहे.

आज राज्यात ४२,४६२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३९ हजार ६४६ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८% एवढे झाले आहे. त्याचबरोबर राज्यात आज २३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी १७ लाख ६४ हजार २२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७१ लाख ७० हजार ४८३ (९.९९  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,००,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६१०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात १२५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. आज सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रूग्ण नागपूरात आढळून आले असून रूग्णांची संख्या ३९ आहे. तर मुंबई- २४, मीरा भाईंदर-२०, पुणे मनपा – ११, अमरावती-९, अकोला-५, पिंपरी चिंचवड – ३, औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर–  प्रत्येकी २, नाशिक, कोल्हापूर, लातूर, सातारा, ठाणे मनपा आणि वर्धा- प्रत्येकी १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०६६१ ९९१३१४ ११ १६४४६
ठाणे ८३८ १११८७५ २२३९
ठाणे मनपा २००२ १७६०७० २१२४
नवी मुंबई मनपा १६२२ १४९२८३ २०१८
कल्याण डोंबवली मनपा १०८१ १६९२८५ २८७८
उल्हासनगर मनपा २०१ २४८२९ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा १४० १२५५९ ४८९
मीरा भाईंदर मनपा ६३७ ७२७९२ १२०८
पालघर ५२६ ६०६६२ १२३५
१० वसईविरार मनपा ७८७ ९४७८७ २१०७
११ रायगड ९५६ १२७३८६ ३३९३
१२ पनवेल मनपा १४७३ ९४९१५ १४४३
ठाणे मंडळ एकूण २०९२४ २०८५७५७ १४ ३६२४३
१३ नाशिक ३९३ १६८०२३ ३७६३
१४ नाशिक मनपा १४८० २४९५७९ ४६६६
१५ मालेगाव मनपा ४२ १०३६१ ३३६
१६ अहमदनगर ३१५ २७६८६२ ५५३२
१७ अहमदनगर मनपा १६२ ७०७९४ १६३६
१८ धुळे ३४ २६४९७ ३६३
१९ धुळे मनपा ९२ २०३९२ २९४
२० जळगाव १८१ १०८११४ २०५९
२१ जळगाव मनपा १३१ ३३५०९ ६५८
२२ नंदूरबार ८७ ४०५४७ ९४८
नाशिक मंडळ एकूण २९१७ १००४६७८ २०२५५
२३ पुणे १९७५ ३८२७६२ ७०५४
२४ पुणे मनपा ५७३९ ५७१३८३ ९३०३
२५ पिंपरी चिंचवड मनपा २४८३ २८९२०२ ३५२९
२६ सोलापूर २१८ १८००२६ ४१४२
२७ सोलापूर मनपा १८८ ३३८५५ १४७५
२८ सातारा ९१६ २५७३३० ६५०६
पुणे मंडळ एकूण ११५१९ १७१४५५८ ३२००९
२९ कोल्हापूर १७८ १५६४७५ ४५४७
३० कोल्हापूर मनपा २४९ ५३२४८ १३०६
३१ सांगली ३९० १६५९२७ ४२८२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५८ ४७४५७ १३५३
३३ सिंधुदुर्ग ११४ ५४२२० १४५२
३४ रत्नागिरी १९९ ८०९७४ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण १३८८ ५५८३०१ १५४३८
३५ औरंगाबाद १३३ ६३४३४ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ४०२ ९६४०१ २३२९
३७ जालना १४९ ६१५१८ १२१७
३८ हिंगोली ६४ १८७१२ ५०८
३९ परभणी ५९ ३४५४७ ७९३
४० परभणी मनपा ६० १८६५२ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ८६७ २९३२६४ ७२२६
४१ लातूर २६३ ७००७३ १८०३
४२ लातूर मनपा १७५ २४९९४ ६४५
४३ उस्मानाबाद १७७ ६९११३ १९९२
४४ बीड ७३ १०४६२७ २८४३
४५ नांदेड १०१ ४७४४८ १६२६
४६ नांदेड मनपा ३०४ ४५६१९ १०३४
लातूर मंडळ एकूण १०९३ ३६१८७४ ९९४३
४७ अकोला ६९ २५९५६ ६५५
४८ अकोला मनपा १८४ ३४५१५ ७७४
४९ अमरावती ६६ ५२७६४ ९८९
५० अमरावती मनपा १०७ ४४४५१ ६०९
५१ यवतमाळ ११६ ७६७६४ १८००
५२ बुलढाणा ११८ ८६१५० ८१२
५३ वाशिम ७३ ४२०२२ ६३७
अकोला मंडळ एकूण ७३३ ३६२६२२ ६२७६
५४ नागपूर ३९१ १३१६५२ ३०७५
५५ नागपूर मनपा १७४३ ३७५२७२ ६०५५
५६ वर्धा २०२ ५८४१० १२१८
५७ भंडारा ९० ६०७२० ११२४
५८ गोंदिया १६५ ४१५०८ ५७१
५९ चंद्रपूर १२६ ६०१८८ १०८८
६० चंद्रपूर मनपा २०३ ३०३९२ ४७८
६१ गडचिरोली १०१ ३११४३ ६६९
नागपूर एकूण ३०२१ ७८९२८५ १४२७८
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ४२४६२ ७१७०४८३ २३ १४१७७९

Check Also

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणतात, जर ही गोष्ट केली तर कोरोनामुक्त होवू जगातील असमानता नष्ट केल्याशिवाय सर्वांना लस मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दोन वर्षे झाली जगात कोरोनाने केलेला प्रवेश काही केल्या परत जात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *