Breaking News

राजकारण

सुप्रिया सुळे यांचा आरोप, पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार पुणेकरांवर भयानक संकट, कपडे आणि ब्लँकेटची मदत करा

पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. ते …

Read More »

नारायण राणे यांचा टोला… विरोधकांची टीका अज्ञानातून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच त्यांना नसल्याने राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. त्यांनी अर्थसंकल्पाबाबतचे तुटपुंजे ज्ञान पाजळू …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाकडून ओबीसी महिला कार्ड काँग्रेससोबत विधानसभा मतदारसंघ अदलाबदली करणार

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या समाधानकारक यशानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभेसाठी आपला टक्का वाढविण्यासाठी व्यूहरचना केलेली आहे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपुरातून ओबीसी आणि महिला कार्ड त्यांच्याकडून वापरले जाण्याची शक्यता आहे . लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने १० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी …

Read More »

विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत काँग्रेसची १० सदस्यीय समिती स्थापन महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा करणार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चेला महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने १० सदस्यांची समिती स्थापन केली. त्यापैकी ३ सदस्य मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. या समितीचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला इशारा, दहशतवाद्यांचे नापाक इरादे कधीही… अग्निपथ योजनेवरून काँग्रेसवरही सोडले टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील प्रॉक्सी युद्धाला पाकिस्तानचा पाठिंबा जाहीर केला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले. जम्मू भागात वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या सर्व नापाक प्रयत्नांमध्ये …

Read More »

गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार “आनंदाचा शिधा” १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ

यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या “आनंदाचा शिधा” संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी द्या मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षणाची संधी

राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप – प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ‘लाडका भाऊ’ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र …

Read More »

अजित पवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेत केली घोषणा, पालिका आणि सरकार मदत करणार एकता नगर आणि सिंहगड रोडवरील पाणी साचलेल्या ठिकाणी भेट

काल दिवसभर पडलेल्या पावसानंतर रात्रीपासून पुण्यात कोसळलेल्या पावसामुळे पुणे शहरात पुर परिस्थिती निर्माण झाली. एकाबाजूला पावसाचे पाणी आणि दुसऱ्याबाजूला खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सिंहगडरोडवरील एकता नगर आणि अन्य भागात जिकडे तिकडे पाणीच पाणी जमा झाले. एकता नगरमध्ये तर छातीपर्यंत पाणी जमा झाल्याचे पाह्यला मिळाले. यापार्श्वभूमीवर दुपारनंतर पालकमंत्री अजित …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्या संकटातील नागरिकांच्या निवाऱ्याची सुरक्षितस्थळी व्यवस्था करावी

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. राज्यात काही दिवसांपासून पूर्व विदर्भ, …

Read More »

नाना पटोले यांचे आव्हान,… क्लिप आहेत, मग कारवाई करा, धमक्या कसल्या देता भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ईडी, सीबीआयकडून कारवाई.

भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे उघड आहे. ज्यांनी भाजपाची ऑफर स्विकारली ते पवित्र झाले व ज्यांनी नाकारली त्यांच्यावर यंत्रणाच्या माध्यमातून कारवाई करुन जेलमध्ये टाकण्यात आले. आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे देवेंद्र …

Read More »