Breaking News

राज्यात ४१ हजार आढळले तर ४० हजार बरे होवून घरी : जाणून घ्या जिल्ह्यात किती रूग्ण होम क्वारंटाईनची संख्या २२ लाखाच्या जवळपास

मराठी ई-बातम्या टीम

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या चांगलीच स्थिरावत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. मात्र होम क्वारंटाईनमधी रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरू पहात आहे. मुंबईत आज ७ हजार ८९५ इतके रूग्ण आढळून आले असून ठाण्यातील शहर व जिल्हा, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, वसई विरार, भिवंडी निझामपूर, नवी मुंबई, उल्हासनगर, पालघर, रायगड आणि पनवेलमध्ये १० हजार रूग्ण आढळून आले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात १० हजार रूग्ण आढळून आले असून उर्वरीत महाराष्ट्रात जवळपास १४ हजार असे मिळून मुंबईसह राज्यात ४१ हजार ३२७ रूग्ण आज आढळून आले. तर आज ४०,३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३% एवढे झाले आहे.

राज्यात आज २९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी १९ लाख ७४ हजार ३३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७२ लाख ११ हजार ८१० (१०,०२  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सध्या राज्यात २१ लाख ९८ हजार ४१४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने  रिपोर्ट केले आहेत. यामध्ये पुणे मनपा – ५ तर पिंपरी चिंचवड – ३ असे रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७८९५ ९९९२०९ ११ १६४५७
ठाणे ७१२ ११२५८७ २२३९
ठाणे मनपा १८२५ १७७८९५ २१२४
नवी मुंबई मनपा १७७९ १५१०६२ २०१९
कल्याण डोंबवली मनपा ८८९ १७०१७४ २८७८
उल्हासनगर मनपा १८२ २५०११ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ८७ १२६४६ ४८९
मीरा भाईंदर मनपा ६९० ७३४८२ १२०८
पालघर ३४६ ६१००८ १२३५
१० वसईविरार मनपा ४५९ ९५२४६ २१०७
११ रायगड ८९४ १२८२८० ३३९३
१२ पनवेल मनपा १६२६ ९६५४१ १४४३
ठाणे मंडळ एकूण १७३८४ २१०३१४१ १२ ३६२५५
१३ नाशिक १२१३ १६९२३६ ३७६३
१४ नाशिक मनपा १६८१ २५१२६० ४६६८
१५ मालेगाव मनपा ४५ १०४०६ ३३६
१६ अहमदनगर ५४४ २७७४०६ ५५३४
१७ अहमदनगर मनपा २६२ ७१०५६ १६३६
१८ धुळे ६६ २६५६३ ३६३
१९ धुळे मनपा १४६ २०५३८ २९४
२० जळगाव १९५ १०८३०९ २०५९
२१ जळगाव मनपा १४६ ३३६५५ ६५८
२२ नंदूरबार १६८ ४०७१५ ९४८
नाशिक मंडळ एकूण ४४६६ १००९१४४ २०२५९
२३ पुणे २१४२ ३८४९०४ ७०५५
२४ पुणे मनपा ५३६३ ५७६७४६ ९३०३
२५ पिंपरी चिंचवड मनपा २४७८ २९१६८० ३५२९
२६ सोलापूर २५३ १८०२७९ ४१४५
२७ सोलापूर मनपा २४३ ३४०९८ १४७५
२८ सातारा १०८२ २५८४१२ ६५१०
पुणे मंडळ एकूण ११५६१ १७२६११९ ३२०१७
२९ कोल्हापूर १७७ १५६६५२ ४५४७
३० कोल्हापूर मनपा ३०० ५३५४८ १३०६
३१ सांगली ३६२ १६६२८९ ४२८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २९८ ४७७५५ १३५३
३३ सिंधुदुर्ग २३६ ५४४५६ १४५२
३४ रत्नागिरी १९३ ८११६७ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण १५६६ ५५९८६७ १५४३९
३५ औरंगाबाद १५९ ६३५९३ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ५१४ ९६९१५ २३२९
३७ जालना १५० ६१६६८ १२१८
३८ हिंगोली ६५ १८७७७ ५०८
३९ परभणी ६४ ३४६११ ७९३
४० परभणी मनपा ६४ १८७१६ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण १०१६ २९४२८० ७२२७
४१ लातूर २८० ७०३५३ १८०३
४२ लातूर मनपा २३२ २५२२६ ६४५
४३ उस्मानाबाद १९० ६९३०३ १९९२
४४ बीड १३० १०४७५७ २८४४
४५ नांदेड २६३ ४७७११ १६२६
४६ नांदेड मनपा ३४४ ४५९६३ १०३४
लातूर मंडळ एकूण १४३९ ३६३३१३ ९९४४
४७ अकोला ८४ २६०४० ६५५
४८ अकोला मनपा २०० ३४७१५ ७७४
४९ अमरावती ७१ ५२८३५ ९८९
५० अमरावती मनपा १५३ ४४६०४ ६०९
५१ यवतमाळ १५१ ७६९१५ १८००
५२ बुलढाणा ८४ ८६२३४ ८१२
५३ वाशिम ५४ ४२०७६ ६३७
अकोला मंडळ एकूण ७९७ ३६३४१९ ६२७६
५४ नागपूर ४७१ १३२१२३ ३०७५
५५ नागपूर मनपा १७८२ ३७७०५४ ६०५५
५६ वर्धा १७९ ५८५८९ १२१८
५७ भंडारा १७४ ६०८९४ ११२४
५८ गोंदिया १५८ ४१६६६ ५७१
५९ चंद्रपूर १६२ ६०३५० १०८९
६० चंद्रपूर मनपा १०१ ३०४९३ ४७८
६१ गडचिरोली ७१ ३१२१४ ६७०
नागपूर एकूण ३०९८ ७९२३८३ १४२८०
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ४१३२७ ७२११८१० २९ १४१८०८

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *