मुंबई: प्रतिनिधी देशातील इतर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत उतरून प्रांतिक असलेल्या शिवसेनेने राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली वाटचाल सुरु केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशपाठोपाठ आता शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. भाजपाला पर्याय ठरण्यासाठी शिवसेना पक्ष …
Read More »औरंगाबाद नामांतर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले शिवसेनेला ढोंगी म्हणे शिळ्या कढीला ऊत आणला जातोय
मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावरून धुराळा उठत असतानाच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नामांतरचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला चक्क ढोंगीपणाची उपमा देत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा …
Read More »पहिल्या दिवशी ८ लाखापैकी इतक्या जणांना दिला कोरोना लसचा पहिला डोस सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ …
Read More »आजचा दिवस क्रांतीकारक पण कोविड सेंटर असेच ओस राहो मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत आजही ते …
Read More »५ वी ते ८ वीच्या शाळा या तारखेपासून होणार सुरु शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन -२०२५ शिक्षणाचा रोड मॅप तयार करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांची कोविडबाबत काळजी घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. …
Read More »राज्यात या तारखेपासून होणार कोरोना लसीकरणाला सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश
मुंबईः प्रतिनिधी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली, त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या …
Read More »माजी मंत्री मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीला धन्यवाद देत लगावला हा टोला सुरक्षा कपातीवरून सरकारला लगावला टोला
मुंबई-चंद्रपूर: प्रतिनिधी राज्यातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याबरोबरच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेत कपात करण्यात आली. या कपातीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला धन्यवाद देत नक्षलवाद संपलेला दिसतोय असा उपरोधिक टोला लगावला. विशेष म्हणजे भाजपाकडून सुरक्षा कपातीच्या निर्णयावर …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंकडून भंडारा रूग्णालयाची पाहणी: पीडीत कुटुंबियांचे केले सांत्वन अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भंडारा: प्रतिनिधी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नागपूरहुन भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या …
Read More »ऐकावे ते नवलचं, जमिन बिगर आदीवासींच्या नावे करायचीय? मग पुष्पगुच्छ तयार ठेवा मंत्री कार्यालयाकडून आलेल्या जमिनीच्या फाईलीच आम्ही करतो
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील आदिवासींना सन्मानाने जगता यावे यासाठी वनहक्क कायद्यान्वये आणि भारतीय राज्यघटनेतील तरतूदीनुसार ते कसत असलेली जमिन त्यांच्या नावावर करण्यात आली. परंतु मागील काही वर्षात वाढत्या शहरीकरणामुळे कधी काळी शहर हद्दीबाहेर असलेल्या वनजमिनी आता हद्दीत येवू लागल्याने आदिवासींच्या जमिनींना कोट्यावधींचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे या जमिनींची …
Read More »भंडारा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश मृत बालकांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत
मुंबई : प्रतिनिधी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक …
Read More »