Breaking News

कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांच्या संख्येत वाढ; मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून पाच लाखांची मदत

मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरातील नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून काल रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूचे वृत हाती आले असून त्यात संध्याकाळी आणखी वाढ होवून १९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे वृत्त कळताच मध्यरात्री नंतर पहाटे ३ च्या सुमारात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. तर सकाळी राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देत मृतांच्या वारसांना ५ लाख रूपये मदत जाहिर केली. तर संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही मदत निधी देण्याची घोषणा करत जखमींवर शासकिय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे जाहिर करत तसे निर्देश दिले.

काल रात्री संध्याकाळी मुंबईत पावसाला सुरुवात झाली. तसेच पावसाचा जोर वाढलेला असल्याने या पावसातच इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या इमारतीत ४० हून अधिक कुटुंबिय रहात होते. इमारत कोसळ्याने यातील अनेक रहिवासी मृत पावले तर अनेक जण जखमी झाले. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन यंत्रणा आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचत ढीगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्याला सुरुवात केली.
या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दूर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात असे निर्देशही दिले आहेत.

घटनास्थळाची पाहणी करत असताना दोघा जखमींना ढिगाऱ्याखालून सुखरूप वाचविण्यात आले. त्यांना तत्काळ शेजारील राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर देसाई यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, या परिसरातील अनेक इमारतींना धोकादायक इमारती म्हणून मुंबई महापालिकेने जाहिर केले होते. तसेच या इमारती रिक्त करण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही येथील नागरीक तसेच या इमारतीत रहात होते असे आता मुंबी महापालिकेडून सांगण्यात येत आहे.

तर सकाळी या दुर्घटनेचे वृत कळताच सकाळी एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाच लाखांची मदत मृतांच्या वारसांना जाहिर केली तर स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघातील ती इमारत असल्याने या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांच्या निवाऱ्याची आणि खाण-पानाची सोय आमदार कुडाळकर हे करणार असल्याचे जाहिर केले.

Check Also

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *