Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

“या” शेतपीकांच्या उत्पादनाच्या वाढीसाठी राज्य सरकार देणार एक हजार कोटी कापूस, सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना

कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात एक हजार कोटी निधी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या विशेष कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे. राज्यातील कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर व सोयाबीन पिकाखाली …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयः योजनेचा लाभार्थी होणार आधार कार्डशी कनेक्ट वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार

राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व लाभार्थींची नावे ३० डिसेंबर २०२२ पर्यंत आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रीया अनिवार्य करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भात राज्याच्या नुकत्याच …

Read More »

भाजपा आमदार अॅड शेलारांचे वांद्रे बॅन्‍डस्टॅंड भूखंड घोटाळयाप्रकरणी पुन्‍हा आरोप पंचतारांकित जागेवर “एसआरए” दाखवून सरकारकडून एफएसआयची खैरात

वांद्रे पश्‍च‍िम बॅन्‍डस्टॅंड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणा-या सरकारी मालकीचा भूखंड बिल्‍डरच्‍या घशात घालून सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करण्‍यात आला आहे. विशेष बाब म्‍हणजे या पंचतारांकित जागेवर “एसआरए” योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्‍डरला देण्‍यात येणार असल्‍याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज …

Read More »

पंडित शिवकुमार शर्मांवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या या भावना

भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पं.शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना निधनाबद्दल श्रद्धांजली मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

राज ठाकरेंचे पत्र, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्हीही मनसैनिकांना बजावलेल्या नोटीसा आणि तडीपारीवरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याच्या प्रश्नावरून राज्यातील मनसैनिकांना पोलिसांनी तडीपारीच्या नोटीसा आणि अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर अखेर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खोचक इशारा देत कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्हीही नाही असे सांगत गर्भित इशारा दिला. मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, उध्दव ठाकरेंना उत्तर देणार १५ मेच्या सभेतून आम्ही उत्तर देऊ

या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास …

Read More »

‘पीकविम्याचे पैसे तातडीने द्या, अन्यथा आंदोलन’ भाजपा आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचे हितसंबंध जपण्यात रस असलेल्या ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने चपराक लगावली असून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना सहा आठवड्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. विमा कंपन्यांनी है पैसे दिले नाहीत, तर ठाकरे सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असेही न्यायालयाने बजावल्याने आता तरी शेतकरीविरोधाची भूमिका सोडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना …

Read More »

खासदार नवनीत राणांचा सवाल, आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का? शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्यावर राणांचा सवाल

रूग्णालयातील एमआरए काढताचे नवनीत राणा यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आज वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात जावून रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत एमआयआर स्कॅन करताना फोटो काणी काढला असा सवाल केला. यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन वर्षापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे …

Read More »

किशोरी पेडणेकरांचे नवनीत राणाला प्रत्युत्तर, मागे अॅम्पलिफायर लावल्याने ती खाज वाढतेय शिवसैनिक अक्कल ठिकाणावर आणतील

१४ दिवसांच्या तुरुंगवासानंतर लीलावती रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आज बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुले आव्हान देत दम असेल तर लोकांमध्ये या आणि कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवा मी तुमच्या विरोधात लढवून दाखवेन असा थेट इशारा देत …

Read More »

रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान, दम असेल तर… पूर्ण ताकदीने प्रचारात सहभागी होणार

हनुमान चालिसा प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रूग्णालयात पाठीच्या दुखण्याच्या कारणाखाली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी दाखल झाल्या. त्यानंतर तीन ते चार दिवस रूग्णालयात राह्यल्यानंतर आज त्या अखेर बाहेर आल्या. बाहेर आल्या आल्या त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान …

Read More »