Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

शरद पवार म्हणाले, केंद्रात कोणताही प्रश्न आला तर महाराष्ट्रासाठी एकच व्यक्ती म्हणजे… दूरगामी दृष्टी, संकल्प आणि तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री

सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अडचणीत असलं की शरद पवार फोन करतात अन्… वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन

साखर परिषद-२०२२ च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर आज उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, जेव्हाही संकट असते तेव्हा शरद पवार हे फोन करतात अन् विचारतात, काय चालले आहे, काय करताय …

Read More »

राज्यसभा निवडणूकः मुदत संपली, कोण कोणाला कात्रजचा घाट दाखविणार ? भाजपा आणि महाविकास आघाडी आमने-सामने

राज्यसभा निवडणूकीसाठी आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि वेळेची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ होती. परंतु घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांची सागर या निवासस्थानी भेट घेतली. मात्र या भेटीत सर्वमान्य तोडगा निघाला नसल्याने अखेर भाजपा आणि महाविकास विकास आघाडी एकमेकांसमोर शड्डू ठोकल्याचे …

Read More »

मास्कबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला “हा” अल्टीमेटम निर्बंध नको तर शिस्त पाळा, मास्क वापरा

कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले. …

Read More »

गोपीचंद पडळकर यांचे आव्हान, स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा

नुकत्यात झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडीतील जयंती उत्सवावरून भाजपाचे आमदार गोपीचांद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच राजकिय नाट्य रंगले होते. तसेच राष्ट्रवादीचा चौंडीतील कार्यक्रम हा पुतण्याच्या लॉंचिंगसाठी होता असा गंभीर आरोपही पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. यापार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आज एक व्हिडिओ जारी करत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

मुंबई पोलीसांना बदनाम करुन बंगल्यावरचे ‘कांचा’ करायचे काय? भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांचा सवाल

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे बेकायदेशीर, अनधिकृत, अर्तक, बालिश, पोरकट असून कधी नव्हे तेवढे मुंबई पोलीसांना बदनाम करण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. पोलीसांना बदनाम करुन त्यांना आपल्या बंगल्यावरील ‘कांचा’ करायाचे आहे काय? असा खरमरीत सवाल करित भाजपा नेते आमदार अॅड.आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तक्रारदारांना आतापर्यंत …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रशासनाला दम; कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरील बैठकीत दिले आदेश

काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पाणी प्रश्नी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जलआक्रोश मोर्चा काढला. तसेच जोपर्यंत पाणी प्रश्न सुटणार नोही तोपर्यंत भाजपा शांत बसणार नाही की झोपणार नाही आणि झोपूही देणार नसल्याचा असा इशारा दिला. वाचा उध्दव ठाकरे म्हणाले, ईडी फिडी लावण्यापेक्षा एकदा चीनला धमकावून दाखवा उध्दव ठाकरेंचा …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले असे सांगत राज्यातील जनतेसाठी जे जे आवश्यक असेल ते आपण करतच आलो आहे. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वेळ पडली तर बँकांचे मेळावे घ्या पण… वित्तीय वर्षासाठी बँकांकडून २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांचा पत आराखडा

पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन बँकांनी मिशनमोड स्वरूपात शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करावे, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. त्यांनी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्राकडे केली मागणी, ७० लाखाहून अधिक शेतकऱ्यांना व्याज परत द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पत्र

केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा २ टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली असून व्याज परतावा बंद …

Read More »