Breaking News

गोपीचंद पडळकर यांचे आव्हान, स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा

नुकत्यात झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडीतील जयंती उत्सवावरून भाजपाचे आमदार गोपीचांद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच राजकिय नाट्य रंगले होते. तसेच राष्ट्रवादीचा चौंडीतील कार्यक्रम हा पुतण्याच्या लॉंचिंगसाठी होता असा गंभीर आरोपही पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. यापार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आज एक व्हिडिओ जारी करत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवत अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा अशी मागणी केली.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास अभिप्रित असेल की, शेकडो हिंदूचे जीव गेलेल्या मुंबई बॅाम्बब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबतचे आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं असल्याचा आरोप पडळकर यांनी आपल्या व्हिडिओतून केला.

तसेच यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो? असा सवाल करत जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदु संस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला.

म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की, हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे त्यासाठी मी आपणास पत्र लिहीले असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना म्हमाले.

नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल असे आव्हान देत आणि होळकरशाहीचा सम्मान कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेले पत्र खालीलप्रमाणेः

 

Check Also

प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *