Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बारामती, माढा, सोलापूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाची राजकिय ताकद म्हणावी इतकी सशक्त राहिली नाही. त्यामुळे या भागातील मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांवर पराभवाची छाया असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवस २९ आणि ३० मे रोजी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर आणि सातारा येथील लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांच्या अनुषंगाने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी काही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.
जयराम रमेश यांनी सोलापूर आणि सातारा येथील मुलभूत प्रश्नांच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित केले ते खालील प्रमाणे

आज पंतप्रधान महाराष्ट्रातील सोलापूर आणि सातारा दौऱ्यावर असताना त्यांच्यासाठी प्रश्न –

1) सातारा आणि सोलापूरमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी काय केले?

२) १७५० कोटींचा सोलापूर ट्रान्समिशन लाईन प्रकल्प इलेक्टोरल बाँड्सच्या बदल्यात खाजगी कंपनीला दिला गेला का ?

3) पुणे-सातारा आणि सातारा-पंढरपूर महामार्ग उद्घाटनाच्या २-३ वर्षातच का खराब झाला आहे?

जुमला तपशील –

१) सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे.मार्च व एप्रिल या कालावधीत सांगलीत १३ टक्के,साताऱ्यात ३१ टक्के आणि सोलापूरमध्ये ८४ टक्के टँकरची मागणी वाढली आहे. या परिसरातील धरणे, तलाव आणि नद्या या वेगाने कोरडे होत चाले आहेत हि खूप गंभीर बाब आहे .मागील १० वर्षात भाजपचे २ खासदार असलेल्या सोलापुरातील परिस्थिती तर खुप वाईट आहे. शहराचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या उजनी धरणातील पाणीपुरवठा शून्याच्या खाली गेला आहे आणि शहरातील पुरवठा सध्या धरणातील “मृत साठा” वर टिकून आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की,सोलापूर महापालिकेला आता आवर्तन पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत असून, शहरातील विविध भागात पाच ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी मिळत आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये सोलापूरच्या भाजपा लोकसभा उमेदवारांनी निवडून आल्यास शहरातील पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, परंतु स्थानिकांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या विजयानंतर ते सोलापुरात फारसे दिसले नाहीत आणि पाणी टंचाई सोडवण्यासाठी त्यांनी कधीही काहीही पावले उचलली नाहीत. पीएम मोदी आणि भाजपने दररोज गंभीर अशा पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या हजारो लोकांच्या दुर्दशेकडे का दुर्लक्ष केले? परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्याकडे काही ठोस योजना नाही का?

२) फेब्रुवारी २०२४ मध्ये, १,५०० मेगावॅट सोलापूर ट्रान्समिशन लाईन प्रकल्पाचे कंत्राट एका विशिष्ट खाजगी कंपनीला, सरकारी मालकीच्या PFC कन्सल्टिंगने दिले होते. या प्रकल्पातून प्रती वर्ष ५० कोटी रुपये हे ३५ वर्षांसाठी , एकूण रु. १,७५० कोटी. मात्र, हे फायदेशीरकंत्राट मिळालेल्या कंपनीने भाजपला मोठ्या प्रमाणात इलेक्टोरल बाँड्स दिले होते. जानेवारी २०२४ मध्ये करार जिंकण्याच्या फक्त १ महिना आधी, त्याने भाजपला ५० कोटी रुपये दिले. हे पंतप्रधानांचा ‘चंदा दो, धंदा लो’ संघटित लूट आणि भ्रष्टाचाराचा भाग आहे का?

३) बहुप्रतिक्षित पुणे-सातारा आणि सातारा-पंढरपूर महामार्ग उद्घाटन होऊन अवघ्या दोन ते तीन वर्षातच उखडून पडला आहे. खडी वापरण्याऐवजी ठेकेदाराने रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी स्वस्त दगड आणि काळी माती वापरली, त्यामुळे रस्त्याला तडे गेले आणि काही ठिकाणी तर खड्डेही पडले आहेत. पुलाच्या स्लॅबवर ६५ मिमी जाडीचा थर टाकणे आवश्यक होते परंतु केवळ २५ मिमी थर वापरण्यात आला. शेतकऱ्यांच्या पाईपलाईनसाठी द्यायचे असलेले क्रॉसिंगही बांधले गेले नाहीत. हे काँक्रीटचे रस्ते ४०-५० वर्षे टिकतात‌ .पण स्थानिक नेत्यांचे असे म्हणणे आहे कि अनुभव नसलेल्या कंत्राटदाराने लाच देऊन च हा प्रकल्प मिळवला आहे. अनेक टाळता येण्याजोग्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या या प्रश्नावर भाजपावाले गप्प का बसले आहेत? हे पण पंतप्रधानांच्या आवडत्या “चंदा दो धंदा लो” योजनेतील आणखी एक प्रकल्प आहे का?

 

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *