Breaking News

Tag Archives: bjp

चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार १ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित …

Read More »

माजी राज्यपाल राम नाईक यांचे पहिल्या मत्स्योद्योग धोरण समितीच्या निमित्ताने पुर्नवसन धोरण समितीच्या अध्यक्ष पदी राम नाईक यांची नियुक्ती

भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या राज्याच्या राज्यपाल पदी केंद्र सरकारने नियुक्ती केली की सदर राजकिय व्यक्तीचे निवृत्तीचे वय सुरु …

Read More »

वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानतानाच वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी जपान सरकारच्या वतीने दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा जपान …

Read More »

ग्रामविकासच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, नाफेडच्या दरातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? कांद्याचे ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच राहील

शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि सरकार आता नाफेड मार्फत केवळ २ लाख टन कांदा २४१० रुपयाने खरेदी करणार आहे. या भावात कांद्याचा …

Read More »

कांदा प्रश्नावरून बच्चू कडू यांचा प्रहार, हे नामर्दाचं सरकार…फक्त ग्राहकांचा विचार करणार केवळ सत्ता टीकविण्यासाठी हे सगळं

नुकतेच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असे वक्तव्य करत जर कांदा महाग झालाय असं वाटत असेल तर खावू नका असे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यातच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या ४० टक्के शुल्कावरून राज्यात राजकिय …

Read More »

शिंदे गटाचा घरचा आहेर, कांद्यामुळे दिल्लीतील सरकार गेलं तर सरकारही हलतं त्यामुळे… शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी करून दिली काँग्रेस सरकारच्या काळातील गोष्टीची आठवण

काही वर्षापूर्वी दिल्लीतील राज्य सरकार आणि काँग्रेसचे सरकार कांद्याच्या वाढत्या किंमतीवरून सत्तेतून पाय उतार व्हावं लागले. तर कोरोना काळापासून देशासह राज्यातील जनतेला सातत्याने महागाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर तसेच कांद्याच्या प्रश्नावर देशातील जनता आणि शेतकरी यांचा रोष किती मोठा असतो याचे ढळढळीत उदाहरणच शिंदे गटाच्या आमदाराने मोदी सरकार …

Read More »

जपानच्या निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस यांचा ५ दिवसांचा दौऱ्यावरः या गोष्टींचा घेतला अनुभव पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. मात्र आज जपान सरकारच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पोहचल्यानंतर त्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतला. अत्त दीप भव… 🕔4.50pm JST | 🕐1.20pm IST21-8-2023 …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, कांद्याला भाव नसताना मोदी सरकार झोपले होते का? निर्यातशुल्कात वाढ ४०% करण्याचा मोदी सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांला मागील काही दिवसात चांगला भाव मिळत असल्याने चार पैसे मिळत होते पण केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारला शेतकऱ्याचे हे सुख पहावले नाही. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के करून कांद्याचे भाव पाडण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या थापा मारणाऱ्या मोदी सरकारने कांद्याचे उत्पादन …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, विरोधातील बातम्यांवर लक्ष ठेवले जाते…फोन केला जातो काही सहकारी तुरुंगात गेले पण पक्ष बदलला नाही

सध्या जे सत्तेत आहेत त्यांच्या कार्यालयात गेले तर त्यांच्या कार्यालयात विविध भाषेतील वृत्त वाहिन्या लावलेल्या असतात. जी भाषा कळत नाही त्या वृत्तवाहिनीवरील बातम्यांवरही लक्ष ठेवले जाते आणि ती बातमी जर सरकार विरोधी असेल तर संबधितांना फोन करून परत होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »