Breaking News

Tag Archives: loksabha election 2024

अखेर एलोन मस्क यांचा भारत दौरा रद्द निवडणूकीनंतर नव्या पंतप्रधानांना भेटणार

भारतातील टेस्ला उत्साही लोकांच्या निराशेचा सामना करावा लागतो कारण एलोन मस्कने आपला देशाचा दौरा रद्द केल्याची घोषणा केली, जी मूळत: पुढील आठवड्यात नियोजित होती. अब्जाधीशांनी टेस्लाच्या त्रैमासिक निकालांच्या निकटवर्ती घोषणेशी संबंधित दबावपूर्ण जबाबदाऱ्या उद्धृत केल्या, चीनमधील घसरत चाललेली वाढ आणि जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात टाळेबंदी यासह आव्हाने दरम्यान एक निर्णायक …

Read More »

शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार संदिपान भुमरे

मागील काही महिन्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरमधील संभावित उमेदवार कोण अशी चर्चा सातत्याने होत होती. अखेर शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगर अर्थात पूर्वीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान फलोत्पादन आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे संदिपान भुमरे यांची थेट लढत शिवसेना उबाठा गटाचे खासदार चंद्रकांत खैरे आणि …

Read More »

“आदित्य ठाकरे मुख्यमंत्री” उद्धव ठाकरे -देवेंद्र फडणवीस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूका जाहिर होऊन पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले. या मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील जवळपास १३ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीत नवीनच मुद्दा पुढे आला. त्यातच भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे …

Read More »

मतदार म्हणून नाव नोंदवलं नाही, पण मतदान करण्याची इच्छा आहेः बातमी वाचाच

निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे. राज्यात पाचव्या टप्प्यात २० …

Read More »

नरेंद्र मोदी यांचा आरोप, साहेबजादे हारतील… परदेशातील शक्तींशी हात मिळवणी

२० एप्रिल रोजी राजकीय पक्षांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी त्यांच्याच पक्षाला मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रचाराची जोरात सुरुवात केली. कर्नाटकातील चिक्कबल्लारपुरा येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवित म्हणाले की, भारतातील आणि परदेशातील मोठ्या आणि शक्तिशाली लोकांनी त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी …

Read More »

मतदार म्हणून काही अडचण आहे? मग हा फोन नंबर डायल करा

भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिले आहे. यांमध्ये सर्वसामान्य माहिती, अर्जाची स्थितिगती, मतदार ओळखपत्र …

Read More »

गडचिरोलीत १११ वर्षाच्या फुलमती यांचे मतदान

१२-गडचिरोली-चिमूर मतदारसंघात १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोंदविले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजीचा आहे. नातवाच्या दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, लोकशाहीसाठी ही निवडणूक महत्त्वाची

सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्त करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल. ही निवडणूक लोकशाही टिकवण्याकरिता महत्त्वाची आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना …

Read More »

नरेंद्र मोदी यांचे भाकित, ४ जूनला एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील…

गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात ५४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे – संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रामटेक ५२.३८ टक्के नागपूर ४७.९१ …

Read More »