राज्यात सरकार पदी कोणतेही भले भाजपाचे सरकार येवो किंवा अन्य कोणाचे येवो, पण महाराष्ट्रातील सहकारी संस्था आणि सहकारी पतपेढींवर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर देशातील सहकारी संस्थांवर काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार कोणाचेही येवो, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय सत्ता केंद्रांना हात लावण्याचे धाडस भाजपाला होत नव्हते. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता केंद्रांना …
Read More »नाना पटोले यांची टोला, गृहमंत्री फडणवीसांनी पक्ष फोडण्यापेक्षा पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे तलाठी परिक्षा पेपर फुटीमागील सर्वांचा छडा लावा...
नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी भाजपाप्रणित राज्य सरकार खेळ खेळत आहे. नोकर भऱती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही अशी एकही परिक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परिक्षेचा पेपर फुटला आणि लाखो तरुणांची निराशा केली. सरकारला परिक्षाही घेता येत नाहीत, सातत्याने पेपरफुटी होत आहे पण राज्य सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, विवेक देबरॉय व रंजन गोगोईंच्या विधानांशी नरेंद्र मोदी सहमत आहेत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रज विचारांचे म्हणून अपमान करणाऱ्यांचा राजीमाना घ्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास, भाजपाला सत्तेतून उखडून टाकून… शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली, काँग्रेस हायकमांड ३१ तारखेच्या बैठकीत पवारांशी बोलतील
काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची …
Read More »काँग्रेसचा सवाल, अंधेरीतील कामगार रुग्णालयात पूर्ण वैद्यकीय सेवा नसतानाही उद्घाटन का ? केवळ अर्धवट OPD विभाग सुरु करुन कामगारांच्या तोंडाला पाने पुसली
अंधेरीतील कामगार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सेवा दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी सुरु करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी या विभागाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला पण हा विभागही पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. या रुग्णालयातील सर्व सेवा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. हे रुग्णालय पूर्ववत सुरु व्हावे यासाठी कामगार संघटना पाठपुरावा …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, हरणार की जिंकणार मतदार…. मोदीजी देश कसा एकसंध ठेवणार
देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन असून प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. आपल्या भाषणात दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांची महती सांगत पेटलेलं मणिपूर यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या विळख्यात अडकला होता हे देखील असा आरोप करत पुढच्या वर्षी …
Read More »मविआतून शरद पवार बाहेर? काँग्रेस-ठाकरे गटाची प्लँन बीची चर्चा ठाकरे गटाच्या खासदाराकडून चर्चेची माहिती उघड
राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये असताना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालविताना शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याभोवतीच राजकारण फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे अधिकृत जाहिर करत भाजपाप्रणित सरकारचा भाग बनले. त्यातच शरद पवार यांची आतापर्यंतची कारकिर्द पाहता ऐनवेळी दगलबाजी …
Read More »नाना पटोले यांचे आवाहन,… स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तरी खोटं बोलू नये एवढीच अपेक्षा
देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून संविधान व लोकशाही …
Read More »नाना पटोले यांची मागणी, …ते १८ मृत्यू सरकारी अनास्थेमुळे; भ्रष्ट सरकारचीच चौकशी करा प्रदेश काँग्रेसची पदयात्रा ३ सप्टेंबरपासून, भ्रष्ट सरकारचा कारभार जनतेसमोर मांडणार
ठाणे महानगरपालिका रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू होतो ही राज्यासाठी लाजीरवाणी घटना आहे. याआधी दोन दिवसापूर्वी याच रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला पण सरकारचे डोळे उघडले नाहीत. केईम रुग्णालयात एका लहान मुलाचा हात कापण्याची वेळ आली तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यूही अशाच बेजबाजदारपणामुळे झाला आहे. …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट इंडिया आघाडीची बैठक तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर केली सविस्तर चर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया …
Read More »