Breaking News

Tag Archives: congress

नाना पटोले यांचा आरोप, मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्याच्या पापाचे…

भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सरकारही हुकूमशाही पद्धतीनेच काम करत आहे. भाजपाप्रणित सरकारने राज्यात मराठा-ओबीसी समाजात वाद उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला संपवण्याचा हा प्रकार आहे. दोन्ही समाजात संघर्ष निर्माण करण्यात सरकारचे योगदान असून मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यातील पापाचे वाटेकरी भाजपा सरकारच आहे, असा हल्लाबोल …

Read More »

आरोग्य व्यवस्थेवरून आमदार प्रणिती शिंदे आणि मंत्री सावंत यांच्यात खडाजंगी

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रूग्णालयांबरोबरच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात येत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडून ठोस उत्तर मिळण्याऐवजी अशा गोष्टींना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा सध्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप,… राज्यातील आरोग्यव्यवस्था खिळखिळी

राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील आरोग्यव्यवस्था खिळखिळी झाली असल्याची टीका करत खिळखिळी झालेली आरोग्यव्यवस्था राज्य सरकारने सुधारावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, आयोगाच्या अध्यक्ष अन् सदस्यांनी राजीनामा का दिले ?

मागील काही महिन्यांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलाच वाद पेटलेला आहे. त्यातच ज्या मागासवर्गीय आयोगाच्या जीवावार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाला न्यायालयात टीकणारे आरक्षण देणार असल्याची घोषणा करण्यात येत होती. त्याच राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य किल्लेदार यांनी नुकताच राजीनामा दिला होता. …

Read More »

काँग्रेसचा एकच नारा… शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा – अशोक चव्हाण

राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत पण भाजपाचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत तर सुपर मुख्यमंत्री उत्तरे देतात. शेतकऱ्यांना भरपूर मदत दिली असे सुपर मुख्यमंत्री म्हणतात पण ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही. सरकारने मदत केली तर मग ती गेली कुठे? …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या धमकावता…प्रश्नावर, मंत्री केसरकर म्हणाले, दोन महिन्यात… अहो तुमचे संकेतस्थळच बंद आहे

राज्यात शिक्षकांच्या रिक्त पदभरतीबाबत एका उमेदवाराने तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्या उमेदवाराला थेट धमकाविता आणि संकेतस्थळ तपासायला सांगता. तुमचे मंत्री म्हणून असलेले धमकीप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. अहो तुमची वेबसाईट अजूनही बंद आहे जरा तपासून पहा मग उमेदवारांना धमकी द्या असा खोचक सल्ला विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी …

Read More »

भ्रष्टाचारमुक्त भारताची ‘मोदी की गॅरंटी’

भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली दोनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या …

Read More »

तेलंगणा राज्यातील निवडणूक निकालः राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणारा

तेलंगणातील निकाल हीच एक गोष्ट आहे जी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये समोर आली आहे. तीन हिंदी-हृदय प्रदेशातील भाजपा विरुद्ध काँग्रेस या लढतीवर ‘राष्ट्रीय’ माध्यमांचे लक्ष केंद्रित असताना, या दक्षिणेकडील राज्यातील बहुकोणीय लढतीतून स्पष्ट निकाल येऊ शकतो. त्याचा राष्ट्रीय राजकारणावरही मोठा परिणाम होईल. सुमारे दोन वर्षांपूर्वीपर्यंत तेलंगणात काँग्रेसची कोंडी झाली होती. …

Read More »

ब्रम्हपूरीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम राज्यभरातील ६०० महिला कुस्ती पटुंचा सहभाग; लाखोंची बक्षीसे

ब्रम्हपूरी शहराला शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन विधानसभा …

Read More »

या प्रश्नांवर काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’मोर्चा महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व …

Read More »