Breaking News

Tag Archives: congress

अशोक चव्हाण यांनी नव्याने धारण केले कमळः काँग्रेस नेमकी चाललीय कुठे?

मागील काही काळापासून अशोक पर्व आणि कफ परेडला लागून असलेल्या संरक्षण दलाच्या जमिनीवर आदर्श नामक इमारतीतील सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपाच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला हात काँग्रेसच्या हातातून सोडवून घेत (राजीनामा देत) भाजपाचे कमळ नुसतेच हाती नाही धरले तर अंगावर धारण केले. …

Read More »

अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती, राजीनामा दिला, पण निर्णय दोन दिवसानंतर

राज्यातील काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ख्याती असलेल्या अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच १५ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यातच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अशोक चव्हाण यांच्या …

Read More »

जयराम रमेश यांची खोचक टीका, त्यांच्या जाण्यामुळे इतरांना प्रगतीच्या संधी

सध्या छत्तीसगडमध्ये पोहोचलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला आदीवासी बहुल कोरबु आणि सुरजगड येथे आज पोहोचली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यावर विचारले असता फारच बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांच्या जाण्याने दुःख जरी झालेले असले तरी पक्षाच्या ताकदीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगितले. जयराम …

Read More »

संजय राऊत यांची टीका, आता अशोक चव्हाणही हात चिन्हावर दावा करणार का?

राज्यातील काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा आज सकाळी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील सहभागी पक्षाच्या नेत्यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यावर खोचक टीका केली. यावेळी संजय …

Read More »

पराभवाच्या छायेत असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा

महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री पद भूषविलेले अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे अनेक नेते पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यातच अशोक चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण …

Read More »

नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास, एकटा भाजपा ३७० जागा जिंकेल

लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत. तसतसा भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींना धार चढत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आगामी लोकसभा निवडणूकी ४०० जागा मिळणार असल्याचा दावा सातत्याने भाजपाकडून करण्यात येत आहे. तर यातील ३७० जागा एकट्या भाजपाला मिळतील असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

सीतारामण यांच्या श्वेत पत्रिकेचा पी चिदंबरम यांनी फाडला, पांढरा खोटारडेपणा…

संसदेचे हिवाळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे आज सुप वाजले. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावेळी मागील सरकारच्या काळातील अर्थात युपीए सरकारच्या काळातील योजना आणि खर्चावर श्वेत पत्रिका काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निर्मला सीतारामण यांनी युपीए काळातील …

Read More »

भाजपाची कमाई तोबा वाढली, वर्षात १३०० कोटी रूपये

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील १० वर्षाच्या काळात भलेही महागाई, बेरोजगारी आणि देशातील सामाजिक स्थैर्य धोक्यात येत धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढीस लागल्याचा आरोप सातत्याने काँग्रेससह विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या एका वर्षात भाजपाला जवळपास १३०० कोटी रूपयांचा निधी इलेक्ट्रॉल …

Read More »

राज्यपालांच्या भेटीत नाना पटोले यांनी केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचे पाप राज्यातील महायुती सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात …

Read More »

अतुल लोंढे यांचा खोचक सल्ला, भाजपाने बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आंदोलन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कागदी ओबीसी आहेत, जन्माने नाहीत या खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातच्या वर्तमान पत्रांमध्ये ‘उच्चजातीचा’ व्यक्ती मुख्यमंत्री झाला, अशा पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर मोदींनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र …

Read More »