Breaking News

जयराम रमेश यांची खोचक टीका, त्यांच्या जाण्यामुळे इतरांना प्रगतीच्या संधी

सध्या छत्तीसगडमध्ये पोहोचलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला आदीवासी बहुल कोरबु आणि सुरजगड येथे आज पोहोचली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यावर विचारले असता फारच बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांच्या जाण्याने दुःख जरी झालेले असले तरी पक्षाच्या ताकदीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगितले.

जयराम रमेश पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाने सर्व काही पद, प्रतिष्ठा दिली. संघटनेबरोबरच घटनात्मक पदावर काम करण्याची संधी ही दिली. मात्र इतके सगळं देऊनही फक्त सत्तेचा गैरवापर करत वॉशिंग मशिन्सचे आकर्षक अनेकांमध्ये निर्माण झाले आहे. त्यामुळेच त्या शक्तीशाली वॉशिंग मशिन्सचे आकर्षण असल्याने वैचारिक निष्ठतेपेक्षा त्याची चकाकीच अनेकांना आकर्षित करत असल्याची खोचक टीकाही अशोक चव्हाण यांच्यावर केली.

पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की, विश्वासघात करणाऱ्या लोकांना त्याची जाणीव नाही. परंतु जे गेलेले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेकांची प्रगती रोखून धरली होती. त्या सर्वांच्या प्रगतीचा मार्ग आता मोकळा झाला असून प्रगतीची संधी न मिळालेल्या अनेकांना आता मोठ्या प्रमाणावर संधी होणार असल्याची आशाही यावेळी व्यक्त केली.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेऊन माहिती देण्याबरोबरच या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी असल्याने संध्याकाळी यात्रा मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यानंतर नाना पटोले आणि राहुल गांधी यांची भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *