Breaking News

राजदचे तीन आमदार गळाला लावत नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत न जाण्याचा निर्धार केलेल्या जनता संयुक्तचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रीय जनता दलाच्या तीन आमदारांना गळाला लावत आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान बिहार विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून पाय उतार होण्यास नकार दिला होता. परंतु बहुमताचा आकडा पूर्ण होताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पायउतार होण्यास भाग पाडले. त्यानंतर उपाध्यक्षांच्या देखरेखीखाली पुढील कामकाजाला सुरुवात झाली.

भाजपा आणि जनता दल संयुक्तला राजदच्या आमदारांना फोडण्यात यश येऊ नये यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या सरकारी निवासस्थानी राष्ट्रीय जनता दलाच्या सर्व ७९ आमदारांना ठेवण्यात आले. मात्र या सर्व आमदारांना घेऊन विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत पोहोचले त्यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे तीन आमदार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसोबत बसल्याचे दिसून आले. तसेच या आमदारांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या बाजूने मतदान केल्याचेही सांगितले.

दरम्यान विद्यमान विधानसभा अध्यक्षांना राजीनामा देण्यास सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आले. परंतु विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे सत्ताधारी जनता दल संयुक्त आणि भाजपाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणत तो जिंकलाही. त्यामुळे बिहार विधानसभा उपाध्यांच्या देखरेखीखाली पुढील कारवाई सुरु करण्यात आली.

बिहार विधानसभेची एकूण सदस्य संख्या २४३ इतकी असून सत्ता स्थापनेसाठी १२२ आमदारांचा जादूई आकडा आवश्यक आहे. मात्र बिहारमधील सत्ता स्थापनेच्या नाट्यात राष्ट्रीय जनता दलाचे तीन आमदार फोडण्यात नितीशकुमार आणि भाजपाला यश आल्याने नितीनकुमार यांच्या सरकारला जनता दलाचे ४५, जीतनराम मांझी यांच्या ४ आमदारांचे आणि भाजपाच्या ७८ आमदारांनी पाठिंबा दिला. तर राजदच्या तीन फुटीर आमदारांनी नितीश कुमार यांच्या बाजूने मतदान केले.

वास्तविक पाहता राजदच्या विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करत उपाध्यक्ष महेश्वर हजारी यांना उपाध्यक्ष यांच्या देखरेखीखाली सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानास सुरुवा झाली. त्यावेळी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग करत सभात्याग केला. त्यामुळे उपाध्यक्ष हजारी यांनी फक्त सत्ताधारी पक्षाने विश्वासदर्शक ठराव जिंकला अशी औपचारीक घोषणा केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी…

सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *