Breaking News

Tag Archives: chief minister

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार

बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेतील करारातूनही २ लाख तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार …

Read More »

निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे खोटी स्वाक्षरी

कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन …

Read More »

राज्यसभेच्या मतदानानंतर हिमाचल प्रदेशातील सरकार पाडण्याच्या हालचाली

हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर निवडूण पाठवयाच्या एका जागेकरीता मतदान झाले. त्यात काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपाला क्रॉस व्होटींग केल्याने भाजपाला विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेस शासित राज्यात भाजपाचा उमेदवार कसा निवडूण आला यावरून राजकिय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच हिमाचल प्रदेश सरकार आता राजकिय रस्सीखेचीच अडकत चालले असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यसभेसाठी …

Read More »

शरद पवार यांची टीका, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे विधान पोरकटपणाचे

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाचा मुद्दा हरकतीच्या मुद्याच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावरून विधानसभा सभागृहात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना पाह्यला मिळाला. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, ते आरक्षण एकमतानं दिलं आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण दिले आहे. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ यांना अधिक सक्षम केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत सांगितले. महाराष्ट्र विधानपरिषद नियम २८९ …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प

भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून …

Read More »

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल ‘फसवणूक नको आरक्षण द्या’

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’ ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांच्या मागे; जरांगेच्या आरोपाला राजकिय वास

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस लांबत चालल्याचे दिसू लागल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरावली सराटे येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर येणार असल्याचा इशारा दिला. या आरोपावरून काँग्रेस, शिवसेना उबाठा गटाकडून सावध भूमिका व्यक्त केली. त्यानंतर अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, कला आणि संस्कृतीच्या समस्या सोडवण्यासाठी समिती…

महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा …

Read More »