Breaking News

मुंबई

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मतदानाची टक्केवारी ही राष्ट्रीय व राज्य सरासरीपेक्षा जास्त असावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा …

Read More »

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नाव नोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, रिसेप्शन हा काही विवाह विधीचा भाग नाही

रिसेप्शन हा विवाह विधीचा भाग मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच असे सांगितले की, मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाला घटस्फोटाच्या खटल्याचा अधिकार नाही. कारण या जोडप्याने मुंबईत लग्नाचे रिसेप्शन केले होते आणि काही दिवस येथेच वास्तव्य केले होते. . “लग्नाचे सर्व विधी ७ जून २०१५ रोजी जोधपूर, …

Read More »

चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाचा पदभार स्वाती म्हसे-पाटील यांच्याकडे

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी असलेल्या स्वाती म्हसे-पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी गुरुवारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. प्रशासनाचा गाढा अभ्यास असणाऱ्या स्वाती म्हसे-पाटील या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन १९९३ रोजी उप जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. त्यावर्षी …

Read More »

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब पडघे-कळवा सर्किट-१ मध्ये भार वाढल्यामुळे ठाणे, कळवा, वाशी, कलरकेम, महापे व टेमघर या परिसरात १६० मेगावॉट इतके विजेचे भारनियमन करावे लागले. महापारेषणची सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यान्वित झाल्याने वीजपुरवठा तातडीने पूर्ववत झाला. दरम्यान, महापारेषणचे अध्यक्ष व …

Read More »

पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे खोटे पत्र प्रसारित केल्याबद्दल प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आचार संहिता व काय़दा विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.अखिलेश चौबे यांनी ही माहिती …

Read More »

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनी राज्यात १ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान एकूण ४२१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, फ्रिबीज, मौल्यवान धातूंचा इतर बाबींचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य …

Read More »

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या वर्षी आदित्य श्रीवास्तव याने प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर अनिमेश प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी याने क्रमांक पटकावला. उमेदवार त्यांचे संबंधित निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी UPSC च्या अधिकृत upsc.gov.in. या वेबसाइटला भेट देऊन अधिकची माहिती …

Read More »

उद्धव ठाकरे यांची घोषणा, कर आकारणीचा विचित्र प्रकार आम्ही थांबवू

मुंबई महानगरपालिका आणि सिडको कडून सध्या जी कर आकारणी केली जात आहे, ती विचित्र पध्दत आहे. या विचित्र पध्दतीमुळे दोनदा कर आकारणी करण्यात येत आहे. माझे वचन आहे की, आम्ही नक्की हा प्रकार थांबवू असे आश्वासन यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी …

Read More »

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत गोळीबार केल्याची केल्याची घटना घडली. या गोळीबारात चार राऊंड झाडण्यात आल्या. तसेच हा गोळीबार सलमान खानसाठीच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने रविवारी बॉलिवूड अभिनेता …

Read More »