Breaking News

मुंबई

उद्धव ठाकरे यांची घोषणा, कर आकारणीचा विचित्र प्रकार आम्ही थांबवू

मुंबई महानगरपालिका आणि सिडको कडून सध्या जी कर आकारणी केली जात आहे, ती विचित्र पध्दत आहे. या विचित्र पध्दतीमुळे दोनदा कर आकारणी करण्यात येत आहे. माझे वचन आहे की, आम्ही नक्की हा प्रकार थांबवू असे आश्वासन यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी …

Read More »

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत गोळीबार केल्याची केल्याची घटना घडली. या गोळीबारात चार राऊंड झाडण्यात आल्या. तसेच हा गोळीबार सलमान खानसाठीच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने रविवारी बॉलिवूड अभिनेता …

Read More »

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी अनेक कौशल्ये कालबाह्य होण्याची शक्यता असून त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम प्रज्ञा कौशल्यांच्या बाबतीत अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. दृष्टिबाधित व्यक्तींना स्पर्शाने समजण्याजोग्या ‘इन्कलुसिव्ह ॲटलास इंडिया २०२४’ या नकाशांच्या पुस्तकाचे …

Read More »

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, जी टीका केली ती ४० आमदार फोडले म्हणून…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच जाहिर सभा घेत राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. या पाठिंब्यावरून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली. या टीकेला राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण, माझ्या नाराजीच्या बातम्या चुकीच्या…

मुंबईत काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत असल्यानेच काँग्रेस आघाडीने याआधी सहाही मतदारसंघात विजय मिळावलेला होता आणि त्यात काँग्रेसच्या पाच व राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा होती. यावेळी महाविकास आघाडी म्हणून जागा वाटपात मुंबई काँग्रेसने तीन मतदारसंघाची मागणी केली होती. पण दोनच मतदारसंघ मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे. विषेशतः मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ काँग्रेसला …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंचे एक चांगले काम दाखवा

उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई …

Read More »

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका…मोदींना बिनशर्त पाठिंबा

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाढवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तसेच राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याची अटकळही बांधली जात होती. त्यामुळे आज मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज …

Read More »

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अंशू सिन्हा यांची नियुक्ती महाराष्ट्र बाल हक्क आयोगावर करण्यात आली आहे. तर दिलीप गावडे यांची डेअरी डेव्हलमेंटच्या …

Read More »

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात …

Read More »