Breaking News

मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत,जाहिरात प्रसिद्ध होऊन …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या चिरंजीवाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहिर

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून राज्यातील सत्तास्थानी असलेल्या शिवसेना शिंदे गटाला किती जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा सोडणार याबाबत प्रसारमाध्यमातून तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका मतदारसंघात जाहिर करण्यात आलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच मुलाच्या अर्थात डॉ श्रीकांत शिंदे यांना …

Read More »

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ शैक्षणिक सत्रापासून सुरू होणाऱ्या इयत्ता ११ आणि १२ वीच्या वर्षअखेरीच्या परीक्षांच्या स्वरूपामध्ये बदल केले आहेत. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बोर्डाने गेल्या वर्षीच्या तुलनेत सक्षमतेवर आधारित प्रश्नांचे वेटेज १०% ने वाढवले आहे आणि लहान आणि दीर्घ स्वरूपाच्या …

Read More »

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढवावी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार …

Read More »

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ …

Read More »

वन्यजीव छायाचित्रकार अमोल हेंद्रे यांचे श्रीलंका दूतावासात प्रदर्शन २०, २१ एप्रिल रोजी कोलंबो, श्रीलंका येथील 'गॅलरी फॉर लाइफ' येथे आणि २७ ते ३१ मे रोजी मुंबईतील श्रीलंका दूतावास कार्यालयात प्रदर्शन

सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि वन्यजीव पर्यटन तज्ञ अमोल हेंद्रे यांच्या थरारक छायाचित्रांचे प्रदर्शन श्रीलंका दूतावासाने कोलंबो, श्रीलंका आणि मुंबई येथे आयोजित केले आहे. २०, २१ एप्रिल २०२४ रोजी कोलंबो येथील ‘ गॅलरी फॉर लाइफ ‘ येथे आणि २७ ते ३१ मे २०२४ रोजी मुंबईतील श्रीलंका दूतावासाच्या कार्यालयात हे प्रदर्शन भरविण्यात येणार …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास …

Read More »

संध्या सव्वालाखे यांची टीका, महिला अत्याचाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाने…

भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची महिलांबद्दल काय धारणा आहे ते जगाने पाहिले आहे. काँग्रेची विधवा, ५० करोड की गर्लफ्रेंड, दिदी ओ दिली, शर्पूणखा असा उल्लेख करुन महिलांचा अपमान करणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभते का? याचे उत्तर आधी भाजपाच्या महिला …

Read More »

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे …

Read More »

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही

सध्या देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. देशाच्या राज्यघटनेवर होत असलेला हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत. प्रकाश आंबेडकर आणि माझे आजोबा यांच्यातील वैचारिक ऋणानुबंधाच्या नात्यामुळे आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केली होती. परंतु आज प्रकाश आंबेडकर काहीही बोलत असले तरी मी त्यांच्या वक्तव्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करणार …

Read More »