Breaking News

मुंबई

शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली

देशातील सर्वात जास्त लांबी असलेला २२ किमीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटात पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री …

Read More »

एमएमआरडीएत ५ सेवानिवृत्त अधिकारी OSD, प्रती महिना १२ लाखांचा चुराडा

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत ५ सेवानिवृत्त अधिकारी वर्गांस विशेष कार्य अधिकारी (OSD ) म्हणून नेमले आहे. प्रत्येक महिन्याला या अधिकारी १२ लाख रुपये वेतन म्हणून अदा केले जात असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली …

Read More »

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबई विभागीय कार्यकारिणी जाहिर

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबई मधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे आढावा बैठकीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीची घोषणा केली. सर्व घटकांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी आम्ही घोषित केली असून आगामी काळात आणखी बऱ्याच …

Read More »

मुंबई विद्यापीठात National Education Policy ची राष्ट्रीय कार्यशाळा

राज्यात National Education Policy अर्थात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत अधिक स्पष्टता यावी, यासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत तसेच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री, नीती आयोग, यूजीसी, नॅक यांच्याशी समन्वय करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत …

Read More »

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ११ कोटी ३४ लाख ६० हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सध्या मंत्रालयातल्या …

Read More »

शिवडी न्हावाशेवा प्रवासासाठीही मुंबईकरांना आता टोल भरावा लागणार

अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला असून सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकरिता परतीचा पास …

Read More »

निर्यात वृद्धीसाठी सागरी मार्गाने व्यापार करणाऱ्यांना विविध सुविधा देणार

राज्यातील सागरी किनारपट्टीच्या बंदरांतून व्यापार आणि आयात-निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. या निर्यातीत आणखी वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून यासाठी जलमार्गाशी संबंधित उद्योजक आणि व्यापाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. लोअर परेल येथील हॉटेल सेंट रेजिसमध्ये आयोजित (राज्यातील बंदर विकासाची गाथा) …

Read More »

किरीट सोमैया यांच्याकडून शरद पवार यांच्यावर PAP घोटाळ्याचा आरोप

काही महिन्यांपूर्वी अर्थात राज्यात भाजपा प्रणित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यावर जरांडेश्वर साखर कारखाना त्यांच्याच मालकीचा आणि हा कारखाना खरेदी करण्यासाठी जी कंपनी उभी करण्यात आली. ती कंपनीही अजित पवार यांच्या समर्थकाचीच असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी …

Read More »

मंत्री लोढा यांची घोषणा, बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी

इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्री लोढा म्हणाले की, …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले “हे” आदेश

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा …

Read More »