Breaking News

मुंबई

संकेत भोसलेला न्याय द्या, राजभवनचा मार्ग रोखला

भिवंडी येथील संकेत भोसले हत्याकांडप्रकरणी भोसले कुटुंबीयांना न्याय द्यावा यासाठी घाटकोपर रमाबाई कॉलनी ते राजभवन असा पायी मोर्चा पोलिसांनी रोखल्याने भीम आर्मी सह आंबेडकरी जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. येत्या दोन दिवसात राज्यपाल यांची भेट घालून देण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन …

Read More »

रेशन दुकानांमध्ये फोर-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय

रेशन दुकानांमध्ये आता 4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्याचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार/गैरव्यवहार थांबविण्यासाठी, …

Read More »

जी एन साईबाबा यांना निर्दोष सोडताच महाराष्ट्र सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील प्राध्यापक जीएन साईबाबांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काही तासांतच, महाराष्ट्र राज्याने मंगळवारी (५ मार्च) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांना मोठा दिलासा देताना, उच्च न्यायालयाने आज माओवादी-संबंधांच्या कथित प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत त्यांची …

Read More »

राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यातील १२ लक्ष ४५ हजार प्रकरणे निकाली

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित या वर्षातील पहिल्याच राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १२ लक्ष ४५ हजार २०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात १० लक्ष ८३ हजार ९७१ वाद दाखलपूर्व प्रकरणे, एक लक्ष ११ हजार ३५२ प्रलंबित प्रकरणे आणि विशेष बैठकीमध्ये ४९ हजार ८७९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे या …

Read More »

सारथी, बार्टी, महाज्योतीच्या फेलोशिप साठी शरद पवार पुन्हा सरसावले

बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांच्या सरसकट फेलोशीप द्यायला सरकारला भाग पाडल्यानंतर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांच्या सरसकट फेलोशिप साठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत .यासंदर्भात पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार असून त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्याची आग्रही सूचना करणार आहेत. सरसकट फेलोशिपसाठी सलग ५२ …

Read More »

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’मध्ये भागीदारी करार

महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी एमएणआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत हा करार …

Read More »

मंत्रालयासमोर सामुहिक आत्मदहन आंदोलनाच्या तयारीत असलेल्यांना घेतले ताब्यात

आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या विकासासाठी शासनाने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे म्हणून मंत्रालया समोर सामुहीक आत्मदहन करण्याच्या हेतूने मंत्रालयाकडे निघालेल्या १३ आंदोलकांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले. या विषयी प्राप्त माहितीनुसार ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’च्या वतीने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री, …

Read More »

वंचितांना उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर भर द्या

देशाची आर्थिक आणि सामाजिक विकासाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्व असून त्यासाठी विद्यापीठांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचविणे, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. हॉटेल ग्रॅण्ड शेरेटन येथे ‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात उच्च शिक्षणाची भूमिका-भारत@2047’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय …

Read More »

शरद पवार गट म्हणतो, माढा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार

माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरनं अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाहनावर गाजरांचा वर्षाव त्यांच्याच मतदारांनी केल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिलं. त्यातच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर

नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक …

Read More »