Breaking News

Tag Archives: chief minister

‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्किल सेंटर ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या बसची पाहणी करून बस विषयी माहिती …

Read More »

…. आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्ट फोन

आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हातून स्मार्ट फोन मिळाला. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि …

Read More »

राज्यपाल बैस म्हणाले, सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र…

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी …

Read More »

मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात तर धास्तावलेले मुख्यमंत्री शिंदे निघाले मुंबईकडे

राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून आतापर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटे पर्यंतच मनोज जरांगे पाटील यांना थोपवून धरण्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुत्सुद्यांना यश येत होते. परंतु आता काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचेच या उद्देशाने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानाला आपल्या आंदोलनाचे केंद्रस्थान बनविण्याचा …

Read More »

ममता बँनर्जी यांनी काँग्रेस सोबतच्या युतीची शक्यता फेटाळला

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षासह देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी नुकतीच काँग्रेसबरोबरील संभाव्य युतीची शक्यता फेटाळत आगामी निवडणूकीत तृणमूल काँग्रेस एकट्याने सामोरे …

Read More »

महात्मा बसवेश्वर महामंडळासह संत काशिबा गुरव महामंडळ कार्यान्वित

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले आहे. या महामडळांमार्फत राज्यातील गुरव व लिंगायत समाजातील घटकांसाठी व्यापार, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय तसेच व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत. या महामंडळाच्या योजनांचा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटली

मुंबई शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून संपूर्ण स्वच्छता मोहीमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण स्वच्छता मोहीमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहीमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी ३५० वरून १०० …

Read More »

अनिल देशमुख यांचा सवाल, मागील वर्षीच्या २.५ लाख कोटींच्या करारांचे काय झाले

दावोस दौऱ्यामुळे राज्यात ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. मात्र या करारामधून किती टक्के उद्योग महाराष्ट्रात येईल यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मागील वर्षी देखील मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्या नंतर २.५ लाख करोड रुपयांचे करार झाल्याचे म्हटले होते. मागील वर्षी झालेल्या करारा मधील …

Read More »

नरसय्या आ़डम पंतप्रधानांच्या उपस्थितीतच म्हणाले, १ लाख लोकांना रोजगार…

सोलापूरातील शहरातील विडी कामगारांना हक्काची घरे मिळावित या उद्देशाने मागील अनेक वर्षे लढा पुकारलेल्या, कम्युनिस्ट पक्षाकडून दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोजगार निर्मितीसाठी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत मिलीटरी कापड निर्मितीची काम दिल्यास येथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल …

Read More »

दावोसमधील परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या माध्यमातून देशात गुंतवणूक…

महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत …

Read More »