Breaking News

नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास, एकटा भाजपा ३७० जागा जिंकेल

लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत. तसतसा भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींना धार चढत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आगामी लोकसभा निवडणूकी ४०० जागा मिळणार असल्याचा दावा सातत्याने भाजपाकडून करण्यात येत आहे. तर यातील ३७० जागा एकट्या भाजपाला मिळतील असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मध्य प्रदेश राज्यातील आदीवासी बहुल झबुआ जिल्ह्यात भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने देशात नेहमी भाषेच्या आधारावर, तर कधी प्रदेशाच्या कारणास्तव तर कधी जातीच्या आधारावर सातत्याने देशाचे विभाजन करण्याचे काम केले आहे. परंतु काँग्रेसच्या राजकारणातील दोन महत्वाच्या बाबी आपणास माहित असून जेव्हा ते देशात सत्तेवर असतात तेव्हा ते फक्त जनतेला फसवित लूट अर्थात भ्रष्टाचारात मश्गुल असतात. मात्र जेव्हा ते सत्तेत नसतात तेव्हा दोन समाजात फूट पाडण्याचे आणि त्यांच्यात सतत भांडण कसे होत राहिल यासाठी लूट आणि फुटीचा वापर करत असल्याचा आरोप करत सत्तेवर राहण्यासाठीच कधी काँग्रेसने जात, भाषा, प्रदेश आदीवरून देश कसा विभाजित राहिल यासाठीच त्यांचे राजकारण सुरु आहे. मात्र आगामी निवडणूकांच्या आधीच काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्षांना पराभव नजरेसमोर दिसत असल्याने त्यांच्याकडून सत्ता मिळविण्यासाठी शेवटचे लूट आणि फुट हे राजकिय डावपेच खेळण्यात येत आहे अशी टीकाही केली.

नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, झाबुआ जिल्ह्या हा जरी मध्य प्रदेशात असला तरी मध्य प्रदेश, गुजरातच्या आणि राजस्थानच्या सीमेपासून जवळ आहे. या तिन्ही राज्यांमध्ये आदीवासी समुदायांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून जवळपास या तीन्ही राज्यात आदीवासी समाजाची एकूण २१ टक्के संख्या असून १४.७५ टक्के आदीवासी समुदायाची लोकसंख्या गुजरातमध्ये आहे तर १३.७ टक्के आदीवासी समुदाय राजस्थानमध्ये असल्याचेही सांगितले.

तसेच नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आगामी लोकसभा निवडणूकीत ४०० इतक्या जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यातील सर्वाधिक जागा ३७० जागा एकटा भाजपा जिंकेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने भाजपाच्या बाजूने आधीच कल दिल्याचे सांगत मी पुन्हा लोकसभा निवडणूकीसाठी आवाहन करणार नाही.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *