Breaking News

भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री नितीशकुमार विश्वासदर्शक ठराव जिंकणार की?

बिहारमधील जनता दल संयुक्त, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्यावर सत्तास्थानी विराजमान झालेल्या महागठबंधन सरकारचा वर्षभरातच राजीनामा देत पुन्हा भाजपाच्या पाठिंब्यावर जनता दल संयुक्तचे प्रमुख नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. उद्या सोमवारी १२ तारखेला भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. मात्र या ठरावा वेळी हिंदूस्थान आवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या चार आमदारांवर सारी भिस्त असल्याची राहिली असल्याची चर्चा बिहारच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठरावा सामोरे जाणार आहे. त्याच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्ताधारी पक्षाच्या सर्वपक्षिय आमदारांसाठी दुपारचे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाला जीतनराम मांझी यांच्याकडील आणि जनता दल संयुक्तच्या एकूण ४५ आमदारांपैकी फक्त ३८ आमदार उपस्थित राहिल्याची माहिती कॅबिनेट मंत्री श्रावणकुमार यांनी दिली. तसेच आजच्या कार्यक्रमाला जनता दल संयुक्तचे १० आमदार गैरहजर राहणार याची माहिती यापूर्वीच संबधित आमदारांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिली होती असेही सांगितले.

त्यातच काही दिवसांपूर्वी हिंदूस्थान आवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांनी त्यांचे चिंरजीव तथा आमदार संतोष कुमार यांना देण्यात आलेल्या मंत्री पदावरून जाहिर नाराजी व्यक्त करत १९८४ ते २०१३ पर्यंत सामाजिक न्याय मंत्री पदाचा कार्यभार माझ्याकडे सोपविण्यात आला होता. आता माझ्यानंतर माझ्या मुलाकडेही या मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माझ्या मुलाला संतोष कुमार सुमन यांना जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सारखे महत्वाचे खाते का देण्यात आले नाही असा सवालही यावेळी उपस्थित केला होता. त्यामुळे १२ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जीतनराम मांझी यांच्या पक्षाचे चार आमदार मतदान करण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर नितीशकुमार आणि भाजपाची सारी भिस्त जीतनराम मांझी यांच्यावर आहे.

बिहार विधानसभेत एकूण २४३ आमदार आहेत. सत्ता स्थापनेसाठी १२२ चा बहुमताचा आकडा असणे गरजेचे आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे ७८ जनता दल संयुक्तचे ४५ तर जीतनराम मांझी यांच्या पक्षाचे चार आमदार संख्येच्या आधारे बहुमताचा आकडा पूर्ण करण्याची रणनिती आखण्यात आलेली होती. परंतु जनता दल संयुक्तचे ७ आमदार आजच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने या नितीशकुमार यांचे सरकार बहुमताचा आकडा पार करणार की याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे जीतनराम मांझी यांच्या पक्षाचे चारही आमदार नितीशकुमार यांच्या सरकारच्या बाजूने मतदान करणार की लालू प्रसाद यावद यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या विरोधी भूमिकेच्या अनुंगाने मतदान करणार यावरूनही तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, महागठबंधन आघाडीकडे राजदचे ७९, काँग्रेसचे १९ आणि डाव्या पक्षांचे १६ आमदार असे मिळून ११४ आमदारांचे संख्याबळ आहे. तर सत्ता स्थापनेसाठी फक्त ८ आमदार महागठबंधन आघाडीला कमी पडत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पाठिंब्यावर ९ व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या नितीशकुमार यांचे सरकारला पाठिंब्यासाठी पक्ष फोडाफोडी करण्याचे निमित्त मिळून महागठबंधन आघाडीतील आमदार भाजपाच्या गळाला लागू नये यासाठी सर्व आमदारांना हैद्राबादला हलविण्यात आले आहे.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *