Breaking News

Tag Archives: narendra modi

प्रकाश आंबेडकर यांचा मोदींना इशारा, आम्ही १५० च्या वर जाऊ देणार नाही

राजकीय दृष्टिकोनातून आज आपण पाहिलं की, जो ओबीसी, धनगर, साळी, माळी, लोहार, सोनार इत्यादी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जागृत झाला. त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली. आज तो स्वतःच्या अधिकारांची सुरक्षा करायला निघाला आहे. म्हणून महाविकास आघाडीला सांगितलं की, जर आपली युती झाली, तर त्यामध्ये किमान १५ उमेदवार हे ओबीसींचे …

Read More »

भाजपाकडून १९५ लोकसभा उमेदवारांची घोषणा; पहिली यादी जाहिर

लोकसभा निवडणूकीचा कालावाधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक गडद होत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाने १९५ लोकसभा मतदारसंघाची अंतिम यादी आणि उमेदवारांची घोषणा आज केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गतवर्षीच्या दोन्ही टर्मनंतर तिसरी टर्मही वाराणसी मधून लोकसभेचे निवडणूक लढविणार आहेत. तर अमेठीतून स्मृती ईराणी आणि लखनऊमधून …

Read More »

अश्विनी वैष्णव यांची मोठी माहिती, तीन्ही सेमिकंडक्टर प्रकल्पांना मंजूरी तिन्ही प्रकल्प गुजरात मध्ये होणार एका प्रकल्पाला गेल्याच वर्षी मान्यता

केंद्र सरकारच्या रु. ७६,००० कोटी ($१० अब्ज) कॅपेक्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेंतर्गत मंजूर झालेल्या चार सेमीकंडक्टर प्रकल्पांमुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सध्या $१०५ अब्ज वरून पुढील काही वर्षांत $३०० अब्जपर्यंत वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल २८ फेब्रुवारी रोजी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज योजनेंतर्गत १.२६ लाख …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदींच्या सभेसाठी पैशाची उधळपट्टी, पंडालवरच १३ कोटींचा खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्याने जनतेचे हाल झाले. मोदींच्या सभेचा खर्च भाजपाने करण्याऐवजी तो सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. केवळ पंडालवरच १२ कोटी ७३ लाख …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, ते तर साधे गावकरी, एका बॅनरची इतकी काय भीती

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील जाहिर कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा २ रा आणि ३ रा निधीचे वाटपही करण्यात येणार आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी १० वर्षापूर्वी दिलेले आश्वासन …

Read More »

विधानसभेत चर्चा मुंबईवरची मात्र वाद नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरून

मुंबईतील पायाभूत सुविधांबरोबर मोकळ्या भूखंडाप्रकरणी आणि परवडणाऱ्या दरातील घरांचा प्रश्नी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने विधानसभेत सादर करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि त्याच्या जमिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी यांना दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्याच्या उद्घाटनाला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प

भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून …

Read More »

गुजरातमधील पहिल्या आणि सर्वाधिक लांबीच्या समुद्रावरील सुदर्शन सेतूचे उद्घाटन

गुजरातमधील अरबी समुद्रातील बेत द्वारका देवभूमी ते ओखा या मुख्य भूमिकेची जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या अर्थात २.३५ कि.मी. लांबीच्या समुद्री पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. विशेष म्हणजे पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या मंदिराजवळ जात दर्शन घेत काही मोर पिसेही ठेवल्याचा एक व्हिडिओ …

Read More »

बांद्रा-कुर्ला संकुलातील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार,२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन…

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये, महागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना …

Read More »