Breaking News

Tag Archives: congress

नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन करणे अवघड मात्र निर्णय मुख्यमंत्री घेणार उद्योग मंत्री सुभाष देसाईंची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथे तीन पेट्रोलियम कंपन्यांकडून रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरण धोक्यात येत असल्याने १७ गावांपैकी १४ गावांच्या ग्रामपंचायतींनी जमिन भूसंपादनाच्या प्रक्रियेत विरोध दर्शविला असल्याने या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करणे अवघड आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याची …

Read More »

मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी सचिन सावंतांवर आणणार हक्कभंग भाजप आमदार राम कदम यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी रिव्हर मार्च या सामाजिक अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतल्यानंतर सातत्याने खोटे आरोप करीत मुख्यमंत्र्यांच्या बदनामी करण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असून विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या अ–६ या शासकिय निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्याआधी सचिन सावंत …

Read More »

राज्य सरकारचे कांऊट डाऊन बिगिन्स सरकारला सत्तेची मस्ती आल्याचा विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेनेला सत्तेची मस्ती आली असून ही मस्ती महाराष्ट्रातील जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही. सरकारला मस्ती आल्यानेच राज्यात मँग्नेटीकचे नव्हे तर फर्स्टट्रेड अर्थात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले असून धड सरकारी धर्म ना पाळला ना शेतकरी धर्म पाळला असल्याची टीका विरोधकांनी करत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या …

Read More »

उद्यापासून राजकिय वातावरण तापायला सुरुवात होणार सोमवारपासून अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी राज्याला आर्थिक दिशा दाखविणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी या अधिवेशनाच्या अनुषंगाने विधिमंडळातील सर्व विरोधी पक्षांची रविवारी दुपारी एक बैठक होत असून त्यात सरकारला घेरण्याची रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असला तरी राजकिय वातावरण …

Read More »

भाजप सरकारचा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हेतर ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ जरी आयोजन केलेले असले तरी या सरकारने यापूर्वीच ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ निर्माण केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सोमवारी लोणी येथे शिवजयंती समारोहानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी अनेक मुद्यांच्या आधारे सरकारवर जोरदार तोफ डागली. आज संपूर्ण राज्यात …

Read More »

मंत्रालयाची सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा सरकारला टोला

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयातील वाढते आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या बसवून फारसा उपयोग होणार नाही. उलट जाळीवर उडी मारल्यास जीव जाणार नाही, फार तर हात-पाय तुटतील; पण आपल्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल,अशी भावना निर्माण झाल्यास अन्यायग्रस्त रोज मंत्रालयात उड्या मारू लागतील. त्यामुळे ही सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सरकारने …

Read More »

अखेर दोन दलित सनदी अधिकाऱ्यांनी केला राजकारणात प्रवेश सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, किशोर गजभियेंचा यांचे काँग्रेसमध्ये स्वागत

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून आणि कार्पोरेट क्षेत्रातील भल्यामोठ्या पगारींच्या आकड्यांना भुलत सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देत कार्पोरेट क्षेत्रात उडी मारणाऱ्या सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि निवृत्त अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नवी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा …

Read More »

शेतकरी धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही भरपाईसाठी एक महिन्याची प्रतिक्षा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा करत होते. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र कठोर काळजाच्या सरकारला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना तातडीने त्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई द्यावी असे अद्याप वाटत नसून धर्मा पाटील यांचे वारस नरेंद्र …

Read More »

संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

जळगांव : प्रतिनिधी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसला इंग्रजांशी लढा दिला होता. आता देशाचे संविधान वाचवण्यासाठी पुन्हा लढा द्यावा लागणार असल्याचे प्रतिपातन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी करत या लढ्यासाठी काँगेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी केले. जळगांवच्या गोदावरी अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्रांगणात आज काँग्रेसचे दुसरे जिल्हास्तरीय शिबिर आयोजित …

Read More »

स्वबळाची घोषणा केली तरी ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या शिवसेनेने जरी केली. तरीही ते सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका होण्यास आणखी वर्ष दिड वर्षाचा कालावधीचा अवकाश असताना भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांनी …

Read More »