Breaking News

मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी सचिन सावंतांवर आणणार हक्कभंग भाजप आमदार राम कदम यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी

रिव्हर मार्च या सामाजिक अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतल्यानंतर सातत्याने खोटे आरोप करीत मुख्यमंत्र्यांच्या बदनामी करण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असून विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या अ६ या शासकिय निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्याआधी सचिन सावंत यांनी राज्य सरकारची परवानगी घेतली होती का असा सवाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

रिव्हर मार्च या संस्थेने नदी शुद्धीकरणाच्या चांगल्या कार्यासाठी आवाहन करण्याची विनंती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना केली. अशाप्रकारच्या अनेक उपक्रमांना त्यांनी यापूर्वीही सहकार्य केले असल्याने त्यांनी त्याचा स्वीकार केला. चित्रीकरणासाठी परवानगी घेऊनही त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, टीसिरिजशी काहीही संबंध नसताना वायफळ आरोप करणे आणि नाहक मुख्यमंत्र्यांच्या बदनामी करणे, याबद्दल आपण त्यांच्याविरोधात सभागृहात हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अहे विरोधी पक्षनेत्यांचे शासकीय निवासस्थान आहे. तेथे काँग्रेस पक्षाच्यावतीने पत्रपरिषदा घेताना त्यांनी राज्य सरकारकडून परवानगी घेतली होती काय आणि घेतली असेल तर त्याचा पुरावा तत्काळ सादर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *