Breaking News

झारखंडमध्ये मंत्री सचिवाच्या नोकराच्या घरून सापडली बेहिशोबी रोकड

ईडी अर्थात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने ६ एप्रिल रोजी झारखंडच्या एका मंत्र्याच्या सचिवाशी कथितरित्या संबंधित असलेल्या घरगुती नोकऱाच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात “बेहिशेबी” रोखड मिळाल्याचा दावा ईडीने केला. तसेच ही बेहिशेबी रोकड जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये केंद्रीय तपास एजन्सीचे अधिकारी एका खोलीतील मोठ्या पिशव्यांमधून चलनी नोटा काढताना दिसत आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाचे काही जवानही दिसत आहेत.

हा परिसर झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या घरातील नोकराचा असल्याचा आरोप आहे.

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की रोख रक्कम २०-३० कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते, मिळालेली नेमकी रक्कम निश्चित करण्यासाठी मोजली जात आहे. सूत्रांनी सांगितले की, “धाडीत मिळालेली रोखड मोठ्या प्रमाणात ₹ ५०० च्या मूल्याची आहे आणि काही दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत.” आलमगीर आलम (वय ७०) हे काँग्रेसचे नेते आहेत आणि झारखंड विधानसभेत पाकूर जागेचे प्रतिनिधित्व करतात.

संबधित बेहिशेबी रोकड ही ग्रामीण विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र कुमार राम यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहेत, ज्यांना ईडीने गेल्या वर्षी अटक केली होती.

“रांची येथील ग्रामीण बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून नियुक्त वीरेंद्र कुमार राम यांनी कंत्राटदारांना निविदा वाटपाच्या बदल्यात कमिशनच्या नावाखाली गुन्ह्याची रक्कम निर्माण केली होती,” असा आरोप ईडीने गेल्या वर्षी जारी केलेल्या निवेदनात केला होता. एप्रिलमध्ये अधिकाऱ्याची ३९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

“अशा प्रकारे उत्पन्न झालेल्या गुन्ह्यातून मिळणारे पैसे वीरेंद्र कुमार राम आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अतिशय भव्य जीवनशैली जगण्यासाठी वापरले,” असेही ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. झारखंड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) तक्रारीवरून वीरेंद्र कुमार राम यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला सुरू झाला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *