Breaking News

संजय राऊत यांची माहिती, हेमंत करकरे आणि आरएसएसमध्ये संघर्ष…

मुंबईवर २६/११रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्या झाला. त्यास आता जवळपास १५ ते २० वर्षाचा कालावधी उलटून गेले. या हल्ल्यात एकमेक पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब हा अतिरेक्याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मादाम कामा रूग्णालयात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आयपीएस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर या तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हेमंत करकरे यांनी ज्यावेळी नांदेड आणि मालेगांव बॉम्बस्फोटाचा तपास सुरु केला त्यावेळी भगवा दहशतवादाची नवी माहिती पुढे आली. विशेष म्हणजे या भगवा दहशतवादाच्या तपासात भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा साध्वी सिंग ठाकूर, कर्नल पुरोहित आणि रमेश उपाध्याय यांची नावे पुढे आली. मात्र २६/११ च्या हल्यात हेमंत करकरे यांचा मृत्यू अजमल कसाबच्या गोळीने झाला नसल्याचा दावा त्यावेळचे माजी पोलिस महानिरिक्षक एम एस मुश्रीफ यांनी त्यांच्या who killed Hemat Karkare ? हे पुस्तक लिहून प्रकाशित करत अनेक घटनांमधील विसंगतीवर बोट ठेवले.

विशेष म्हणजे या प्रकरणातील सरकारची बाजू मांडणारे अॅड उज्वल निकम यांना भाजपाने नुकतीच मुंबई उत्तर-पश्चिम मधून लोकसभेची उमेदवारी जाहिर केली. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा या पुस्तकातील मुद्याचा उल्लेख करत अॅड उज्वल निकम यांच्यावर निशाणा साधला. त्यातच आज शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रश्न नव्याने उपस्थित करत नवीनच माहिती पुढे आणली आहे.

संजय राऊत हे सकाळी नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, हेमंत करकरे यांना पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याची गोळी लागली की नाही हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. हेमंत करकरे हे एसटीएसचे प्रमुख होते. तसेच हेमंत करकरे हे देशासाठी लढताना शहिद झाले.

हेमंत करकरे यांनी कोणाची गोळी लागली असे वाटते यासंदर्भात विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला विचाराल तर असे काही वाटत नाही. मात्र विजय वडेट्टीवार यांनी काही तसे वक्तव्य पहिल्यांदा केले असे नाही तर यापूर्वीही हेमंत करकरे यांच्याबाबत यापूर्वीही विधान केलेले आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रज्ञा साध्वी सिंग ठाकूर, कर्नल पुरोहित आणि रमेश उपाध्याय यांना अटक करण्यात आली त्यावेळी या प्रकरणाचा मी अभ्यास केलेला आहे. त्यावेळी आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे काही लोक माझ्याकडे यायचे, करकरेंनी चुकिच्या पध्दतीने कारवाई केल्याचे सांगायचे. कर्नल पुरोहित यांचे कुटुंबिय आमच्या कुटुंबियाकडे यायचे, आरएसएस आणि करकरे यांचा संघर्ष सुरु होता. विशेष म्हणजे या आरोप-प्रत्यारोपात विजय वडेट्टीवार यांचे नाव का घेता असा सवाल करत यासंदर्भात विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचे बंधु एस एम मुश्रीफ यांनी ते पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारयचा असेल तर मुश्रीफ यांना विचारा असे सांगत कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हे संघाचे लाडके होते, त्यांना अटक झाल्यानतर आरएसएस आणि हेमंत करकरे यांच्यातील संघर्ष सुरु झाला होता असेही यावेळी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *