Breaking News

Tag Archives: mumbai

काँग्रेसचा सवाल, अंधेरीतील कामगार रुग्णालयात पूर्ण वैद्यकीय सेवा नसतानाही उद्घाटन का ? केवळ अर्धवट OPD विभाग सुरु करुन कामगारांच्या तोंडाला पाने पुसली

अंधेरीतील कामगार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सेवा दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी सुरु करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी या विभागाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला पण हा विभागही पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. या रुग्णालयातील सर्व सेवा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. हे रुग्णालय पूर्ववत सुरु व्हावे यासाठी कामगार संघटना पाठपुरावा …

Read More »

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले. माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था …

Read More »

… देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

“देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान …

Read More »

२०२६ पर्यंत मुंबईच्या ५ एन्ट्री पॉइंटवर टोल वसूल करण्याचा अधिकार मुंबई टोलमुक्त करा, अनिल गलगली यांची मागणी

मुंबईतील ३१ फ्लाईओवर पूलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या ५ प्रवेश नाक्याचे कंत्राट अवघ्या रु २२४२.३५/- कोटीस एमईपी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीस दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएसआरडीसीने दिली आहे. वर्ष २०२६ पर्यंत मुंबई टोलमुक्त होऊ शकते कारण तोपर्यंत मुंबईतील ५ एन्ट्री …

Read More »

राज ठाकरे यांच्याशी उद्धव ठाकरे बोलणार स्व.बाळासाहेब यांच्या स्मारक उभारणीसाठी राज ठाकरे यांचे मतही विचारात घेणार

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. कधी काळी लोकांनी मोर्चे काढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करावी आणि राजकियदृष्ट्या एकत्र यावे अशी मागणी करण्यात येत होती. तसेच सर्वात आधी टाळी कोणी कोणाला द्यावी यावरूनही सातत्याने …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील  परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री मंगलप्रभात …

Read More »

सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही शनिवार असूनही कामाचा उरक

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि.४) रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशन काळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला. तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला २४ तास होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाईला सुरूवात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल तर माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ

काल विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाकाळात मृत पावलेल्या लोकांना सोडणार नाही असा गर्भित इशारा ठाकरे गटाला दिला. त्यास २४ तास उलटत नाही तोच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे येत असून त्यांच्यावर मृतांसाठी लागणाऱ्या बँगेच्या …

Read More »

मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ अखेर मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या खुर्चीवरील स्टीकर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी काढले

मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मंचावर एक खुर्ची राखीव ठेवण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री आले नसल्याने त्या खुर्चीवर लावण्यात आलेले स्टीकर विधानसभा अध्यक्ष राहुल …

Read More »

मुंबई उपनगरातील रस्ते दोन वर्षाच्या आत काँक्रीटकरण करणार पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतुकींच्या कोंडींचा सामना करावा लागत आहे, यासाठी तातडीने खड्डे भरण्यात यावेत. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्ते दोन वर्षाच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटकरण करण्याच्या …

Read More »