Breaking News

Tag Archives: mumbai

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाख देणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'महिला व ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद'

ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा …

Read More »

राष्ट्रपती म्हणाल्या, आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज राज्यपाल भवनाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून राष्ट्रपतींना माहिती

मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकरमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रपतींनी प्रथम राज्यातील तसेच देशातील आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन आदिवासी क्रांतिकारकांबाबत …

Read More »

मुंबई शहरातील ३६५ कोटींच्या या कामांना मंजुरी शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावित- पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या माध्यमातून ३६५ कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्प‍ित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित, असे निर्देश शालेय शिक्षण व मराठी भाषा …

Read More »

संजय राऊत यांचा घणाघात, दिल्लीचे दोन बोके आणि ४० खोके… पंतप्रधान मोदींसह शिंदे गटावर हल्लाबोल

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येत असलेल्या मुंबईतील कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून आज शनिवारी मुंबईत महामोर्चाच आयोजन करण्यात आलं. या मोर्च्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून मनपा कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडून ऑफर… सत्ता आल्यानंतर त्यांच्यावर बुलडोझर चालविणार

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘धडक मोर्चा’चं आज ( १ जुलै ) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकार आणि पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला. यावेळी सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आमचं सरकार आल्यानंतर …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या या १२ महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करण्याचा दर्जा मिळणार

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. यानुसार आता या अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित/सह (Joint Degree) पदवी प्रदान करता …

Read More »

अनधिकृत शाळांची यादी तर जाहिर पण ना दंड आणि गुन्हा मुंबई महानगरपालिकेची हाताची घडी तोंडावर बोट

मुंबई महानगर पालिका प्रत्येक वर्षी अनधिकृत शाळेची यादी जाहीर करते पण नियमाप्रमाणे दंड आणि गुन्हे दाखल केले जात नाही. दाखल केलेला गुन्हा आणि दंडाची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली असता कार्यवाही सुरु असल्याचे थातुर मातुर उत्तर शिक्षण खात्याने दिले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या शिक्षण खात्यास …

Read More »

खासदाराचे नेमके काम काय? जीव धोक्यात आल्याने मतदाराने लिहिले खासदारांना पत्र राहुल शेवाळे यांना पत्र पाठवित करून दिली जबाबदारीची जाणीव

देशाच्या धोरणाला दिशा मिळावी म्हणून निवडून दिलेले खासदार निवडल्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करतात परंतु आता निवडणूक जवळ आल्याने प्रसिद्धीसाठी गटारावर अनधिकृतरित्या उभ्या राहिलेल्या मंदिराची उभारणी करताहेत, हे बेकायदेशीर काम केल्याने जीव धोक्यात आलेल्या नागरिकांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांना अनावृत्त पत्र लिहिले असून ते सध्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकण पर्यटनाला चालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत

मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर काल सायंकाळी …

Read More »

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई पालिकेवर मोर्चा काढत केला राडा

मुंबई महापालिकेकडून काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याविरोधात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयात पोहोचल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण करत राडा केल्याचा प्रकार समोर आला …

Read More »